26.3 C
Mālvan
Tuesday, September 17, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

” का नाही आवडणार मला नोबेलच्या रांगेत उभे रहायला..?” : डाॅ. अनिल फाॅक्स सनीबॅन्कर.. ( विशेष मुलाखत)

- Advertisement -
- Advertisement -

आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल | मुलाखत :
गेली वीस वर्षे अथकपणे सामाजिक परिवर्तन चळवळ साहित्य काव्य कला रंगभूमी तत्वज्ञान संगीत समीक्षा वैचारीक लेखन यांचा अहोरात्र ध्यास घेत प्रवाहाच्या विरोधी प्रवास करत असंख्य अडचणी अवहेलना उपेक्षा यांचा सामना करत अनिल जिजाबाई तुकाराम कांबळे अर्थातच डॉ. अनिल सरमळकर हा लेखक विपुल लेखन करूनही त्यांच्या जगप्रसिद्ध ‘ द फॉक्स ‘ नाटकामुळे जागतिक साहित्य रंगभूमी आणि बुद्धीमंत वर्तुळाच्या क्षितिजावर आज झळकत आहे तसेच महान भारतीय अभिनेते महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांनी अनिल यांच्या लिहिलेल्या ‘ सनी बॅंकर ‘ या चित्रपट कथेचे कौतुक करुन स्वतः भूमिका करण्यास होकार दिल्याने अनिल सरमळकर हे नाव पुन्हा एकदा प्रचंड चर्चेत आले.

गेले वीस वर्षे ,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा शहर व परिसरात एक वेगळीच शांत ध्येयाची मूक ऊर्जा घेऊन आणि खांद्याला शबनम लावून पायपीट करत धडपडणारा एक साध्या चणीचा युवक हजारो जणांनी पाहिलेला होता. पण हा नेमका कोण आहे …हा असा शांत झपाटलेला का असतो…हा अबोलही का असतो वगैरे प्रश्नांची उत्तरे मात्र लोकांना मिळत नव्हती.
पण ‘द फाॅक्स’ या त्याच्या पुस्तकाला तथा नाटकाला धडाधड आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि नामांकने मिळू लागली तेंव्हा त्या शांतचित्तामधला धगधगता ज्वालामुखी जगाने जाणला.

नुकताच त्यांनी लेखन व दिग्दर्शन केलेला सनीबॅन्कर मध्ये दस्तुरखुद्द महानायक अमिताभ बच्चन भूमिका निभावणार असल्याचे कळताच डाॅ. अनिल सरमळकर यांच्या प्रायोगिक,सामाजिक व व्यावसायिक अशा तिन्ही क्षमतांची ओळख कला क्षेत्राला होत आहे.

नाटक कादंबरी समीक्षा काव्य तत्वज्ञान संगीत याचा वैश्विक आवाका पेलणार्या या लेखकाचा गेल्या वीस वर्षांचा प्रवास खूप खडतर आणि वेदनादायी तेवढाच प्रेरणादायी आहे. अलीकडेच अमेरिकेतील इंडियाना युनिव्हर्सिटीतील इंग्रजीचे प्रोफेसर समीक्षक लेखक ज्युडीथ ब्राउन यांनी त्यांचे लेखन वाचुन म्हणाले आहेत, ” अनिल नकीच येत्या काही काळात नोबेल प्राईझच्या रांगेत असतील असे त्याचे लेखन आहे अनिल नोबेलसाठी सुटेबल बॉय आहे . असेच प्रशस्तीपत्र त्याना ज्येष्ठ फिल्ममेकर समीक्षक
सौमित्र चॅटर्जी यानीही दिले आहे
त्या पार्श्वभूमीवर आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलचे संस्थापक व मुख्य संपादक सुयोग पंडित यांनी डाॅ. अनिल फाॅक्स सनीबॅन्कर तथा डाॅ. अनिल सरमळकर यांच्याशी साधलेला हा संवाद.
……………………………..

प्रश्न : डाॅ . अनिल..तुमचे मनापासून स्वागत आहे. सध्या आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्वांकडून तुमचे नाव चक्क नोबेलसाठी घेतले जात आहे…..ही तुम्हाला अतिशयोक्ती वाटते किंवा खोटी प्रशंसा वाटते की आणखीन
काय वाटते तुम्हाला याबद्दल?

डाॅ अनिल : खरोखरच हे अविश्वसनीयच असे आहे.
आपल्या देशात खुप श्रेष्ठ कवी लेखक आहेत व आधीही झाले आहेत मात्र त्या तुलनेने मी खूप नवखा लहान आहे माझे लेखन अजुन खुप व्हायचे आहे.
मात्र मी लिहित राहणे यालाच महत्व देतो पण लेखन जागतिक स्तरावर पोहचत आहे त्याची दखल घेतली जात आहे हे खुप महत्त्वाचे आहे… आदरणीय सौमित्र चॅटर्जी सर आणि आता सन्माननीय ज्युडिथ सर यांनी माझ्या लेखनाला पुढे कदाचित नोबेल मिळु शकेल असे जे म्हणालेत त्या बद्दल मी काय आणि कसे बोलू? त्यांनी दिलेले हे प्रोत्साहन आहे त्यांचे मन मोठे आहे खुप.. अर्थात माझ्यावरील जबाबदारी तेवढीच मोठी आहे हे लक्षात येत आहे .. पण इतर गोष्टींकडे लक्ष देण्याआधी लिहित राहण आणि नोबेल च्या रांगेत राहणं मला आवडेल.
अगदी ते नाही मिळणार तरीही.
नोबेल…व्हाय नाॅट…? आय वुड डेफिनेटली बी लाईक टू बी वन ऑफ द नाॅमिनीज् ॲटलीस्ट.
( डाॅ. अनिल स्मितहास्य करत आत्मविश्वासाने म्हणतात)

प्रश्न : इथवरच्या प्रवास सोपा निश्चितच नव्हता.. कसा होता
हा प्रवास तुमचा ?

डाॅ.अनिल: गेली वीस वर्षे एक एक क्षण मी अस्वस्थ राहिलो आहे आपुलाच आपणाशी असं जगणं. अविरत
कविता कलेचा विचारांचा ध्यास
आणि व्यवहाराचे असंख्य चटके वेदना निराशा एकाकीपणा अती आक्रमकपणा आणि अतीकाव्यमय जगण्याने येणारा
आउटसायडरपणा आणि अनेक वैचारीक वावटळी स्वतामधे झेलत अपमान बदनामी झेलत हे भयाण म्हणावं असं जगणं होतं
माझं त्या दरम्यान झालेले प्रचंड लेखन जे आजही अप्रकाशित आहे.
या काळात आई आणि बहीण या दोघांनी खूप समजुन घेतले मित्र नव्हतेच जे होते ते मनःस्ताप देणारे होते पण मोजके अपवादही होते माझ्या स्वताच्याच आणि स्वतःच्याच गावच्या लोकांनी मला प्रचंड दु:ख दिले. तरी विनाकारण मी त्यांच्याच भल्याचा विचार करत होतो …
आणि साहित्य क्षेत्रात माझी ठरवुन माझ्याच जातीतील आणि इतर जातीतील लोकांनी उपेक्षा आणि बदनामी केली…

कदाचित अमेरिका इंग्लंड येथील साहित्य कला रंगभूमीवरील ग्रेट लोकांनी माझी दखल घेतली नसती तर मी आजही कदाचित अंधारातच राहिलो असतो…

प्रश्न : ज्या ‘ द फॉक्स ‘ मुळे तुम्ही पूर्ण जागतिक रंगभूमीवर प्रकाशात आलात ते नाटक काय आहे ?

डाॅ.अनिल : मी मुळात आधुनिक आणि उत्तर – आधुनिक प्रवाहातील लेखक आहे आणि जागतिक साहित्य आणि तत्वज्ञान चा विद्यार्थी आहे त्यामुळे मी साचेबद्ध आणि झापडबंद विचात करत नाही त्यामुळेच भारतीय रंगभूमी आणि साहित्य यांचे सारे ठोकताळे तोडुन आणि उत्तर आधुनिकतेच्या विखंडन प्रवाहाचा विचार करुन एकुण जागतिक नाटकाच्या परिपेक्षात हे नाटक वेगळे आहे ते एकूण मानवाच्या प्राक्तनाबद्दल बोलते तेवढेच त्याला आधुनिक आणि उत्तर आधुनिक साहित्याचे संदर्भ आहेत भव्यता शोकात्मिका आणि अराजकाचा भयंकर जीवघेणा खेळ आहे हे नाटक …

प्रश्न : आता सध्या ज्याची भारतीय व्यावसायिक वर्तुळात चर्चा आहे अशा सनी बॅंकर ‘ बद्दल काही सांगू शकाल…शक्य असेल तर. कारण प्रकल्प संपूर्ण व्यावसायिक आहे..

डाॅ अनिल सरमळकर: (थोडा पाॅज घेत )….ते जणु स्वप्न आहे सर .. ती एक ब्लॅक कॉमेडी.. सटायर आहे आणि त्यात मॅजिक रियॅलिजमही आहे साक्षात बिग बी यांना समोर ठेवून लिहिलेली ही कथा आहे सर ..
ती पडद्यावर येईल तेव्हा अचंबित करणारी असेल मी कल्पकतेला बेछूट सोडले आहे या कथेमधे पण बोचरे आणि हसवणारे भाष्य करताना ही कथा आजच्या समाज व्यवस्थेबद्दल बोलते.. ही कथा व्हीएफएक्स ची मोठ्या प्रमाणावर मागणी करणारी आहे… प्राथमिक गोष्टी पार पडत आहेत .. बिग बी म्हणजे आम्हा कलाकारांचा साक्षात विठ्ठल… त्यांना माझी ही कथा आवडली हेच माझ्यासाठी माझ्या लेखन प्रवासातील एक भव्य घटना आहे एक दिलासा आणि बळ देणारी गोष्ट आहे …

प्रश्न : तुम्ही केवळ एका विशिष्ट गटाचे समाजाचे जस्तीचे विचारसरणीचे नाही आहात लेखक म्हणुन
कसे जमते हे तुम्हाला ?

डाॅ अनिल: लेखक नसतोच कधी एका गटाचा समुहाचा आणि त्याने असुही नये कधी … सांगतो
माझ्या आई बाबांनीच मला पहिल्यापासुन वाचण्याचे स्वातंत्र्य दिले.. ते अडाणी असूनसुद्धा त्यांनी मला अभ्यास करायला खुप मोकळीक दिली त्यांचे उपकार सर्वात मोठे आहेत आणि लहानपणी आजीने दिलेले धडे नेहमीच मदतीला आलेत आणि नंतर मी भारतीय साहित्य आणि जागतिक साहित्य लॅटीन अमेरिकन फ्रेंच जर्मन साहित्य पिंजून काढले.. त्याशिवाय संत कवीता जागतिक कविता संगीत सिनेमा चित्रकला शिल्पकला रंगभूमी जे जे मिळेल ते वाचत गेलो त्या नंतर एक कवी आणि लेखक म्हणुन मी एका वर्गाचा राहुच शकलो नाही ..

प्रश्न : लेखक म्हणुन समाजाला काही संदेश देणार ?

डाॅ.अनिल: भौतिक समृद्धी आणि विषमता आणि सर्व प्रकारचे अराजक आज निर्माण झाले आहे. प्रशांची रेडीमेड उत्तरे शोधु नका त्याना सामोरे जायला हवे आहे ..
संस्कृतीनेच जगभर भयावह समस्या निर्माण केल्या आहेत त्यासाठी त्यातील जे कालबाह्य आणि जीर्ण आहे ते सोडण्यासाठी जो आंतरिक संघर्ष मानव जातीला करायचा आहे त्याची आता कठीण वेळ आली
आहे .. मानव्याचे जतन करण्यासाठी पुन्हा एकदा पसायदान प्रत्यक्षात मागायला हवे आहे … अगदी मनापासुन …
ज्ञानदेव आपले आडनाव काय आहे यावरुन नाही समजत न्यानदेव एक अमृतानुभव आहे
न्यानेश्वर सर्व काही आहे बंडखोर महाकवी युगप्रवर्तक युगधारक
आणि सांस्कृतिक क्रांतीचा उद्गाता… आपण पसायदान लबाडीने मागितले म्हणुन आज
एक लबाड आणि सवंग आणि हिणकस सर्वांगाने दरिद्री समाज निर्माण केला आहे जो विनाशास पात्र आहे ….

ज्ञानदेव माझे आणि माझ्या कवी लेखक असण्याचं विराट संचित आहे … त्यानेच तर मला दुसरा मराठी महाकवी दिला .. नामदेव ढसाळ.

प्रश्न: आता जाता जाता एक प्रश्न. समाज साहित्य आणि आजचे बदलले जग या बद्दल तुमचे विचार काय आहेत ?

डाॅ.अनिल: सर आज संपूर्ण मानवी समाज एका अपरिहार्य अशा सांस्कृतिक घुसमटीतुन जात आहे. हे सांस्कृतिक संक्रमण आहे की हा जगातील सर्व विचारसरणी धर्म तत्वे पंथ साहित्य कला यांचा साचलेला तुंबारा आहे की त्यातून काही एक नव्या युगाची निरगाठ आहे ती सुटणार आहे हे समजणे अंधुक झाले आहे. आजही भल्या भल्या विचारवंत बुद्धीमंत तत्वज्ञानी कवी महाकवी लेखक महालेखकांना उमजत नाहीये की या काळाचे प्रेडिक्षन काय आहे
याचा स्पष्ट निर्वाळा काय आहे ..
आपण मानवी समाजाला त्या त्या देशात त्या त्या देशांच्या संस्कृती परंपरा आणि असामासिक तत्वांच्या आत कोंडुन ठेवले आहे आणि केवळ हजारो वर्षे केवळ व्यवहारासाठी भौतिक प्रगतीसाठी आणि युद्धे करण्यासाठी जगाशी संपर्क ठेवला त्याचे आजचे स्वरूप म्हणजे आजचे हे आधुनिक उत्तर आधुनिक जागतिकीकरण….
सर्व सुखे आणि सुविधा एवढ्याचसाठी आजही आपण विद्न्यान आणि तंत्रज्ञानाचा विचार करतो आणि आभाळाला टेकतील एवढे साहित्य तत्वज्ञान आणि धर्माची पुस्तके निर्माण केली मात्र नव्या मानवी समाजाला नवी रचना आवश्यक आहे याचा विचारच केला नाही आपण यामध्ये आपण केवळ भारतीय लोक नाही तर सर्वात जास्त युरोप आणि इतर संस्कृती आणि देश याला जबाबदार आहेत कारण विखंडित मानव निर्माण करण्याचे घोर पाप औद्योगिक क्रांती नंतर युरोपने केले आहे .. नवा समतोल समाज समतोल माणुस निर्माण न करता केवळ औद्योगिकीकरणाच्या महा राक्षसी भुकेपोटी आणि अहोरात्र शोषण करणाऱ्या निर्दयी अमानुष भांडवलदारीसाठी तिला जगवण्यासाठी सर्व सुखे सुविधा वासनांसाठी वखवखलेला सैतानाने भारलेला मानव समाज आपण निर्माण केला आहे
आणि केवळ प्रत्येक गोस्ट विकत घेण्यासाठी आणि विकण्यासाठी आपण कला साहित्य तत्वज्ञान विद्न्यान आणि तंत्रज्ञानही आपण विकायला काढले आहे …
म्हणूनच कला साहित्य आणि तत्वज्ञानाची भूमिकाच संपवली गेली आहे त्यांचा आता या उत्तर आधुनिक काळात अंत झाला आहे ….

या भयाण विक्राळ वैश्विक चक्रातून जगाला बाहेर काढण्याची ताकद आजही उदात्त असणाऱ्या भारतीय विचारांत आहे. मात्र भारतीय समाज केवळ या उदात्त मुल्यांचा उदघोष करत राहिला आणि प्रत्यक्षात मात्र विषम आणि अन्याय समाज व्यवस्थेचे समर्थन करत राहिला आजवर त्यामुळेच आजही भारतीय विचारांत महाकाव्ये उपनिषदे वेद विवेकानंद बुद्ध न्यानेश्वर संत तुकाराम आणि समग्र संत काव्य परंपरा हे विराट मानवीय सृष्टीचे विचार भारतालाच नव्हे तर जगाच्या साहित्य कला आणि सांस्कृतीकतेचे तारक ठरु शकतात किवा नवा आवश्यक तो रेनेसान्स, युगारंभ घडवुन आणु शकतात…
युरोपिय समाजात होमर पासून शेक्सपियर ते टॉल्स्टॉय गॉर्की ते हेमिंग्वे ते सॅमुएल्स बेकेट अल्बर्ट काम्यू ते जेम्स जॉईस ते रॉबर्तो बोलॅनो मुराकामी असा खुप प्रचंड व्यापक पट असला तरी
आणि महाकाय तत्वज्ञान परंपरा असली तरी आज विश्व साहित्य अपवाद सोडला तर कोणतीही भूमिका न घेता लेखन केले जात आहे केवळ उत्तर आधुनिकतेच्या गोंडस नावाखाली.. मुराकामी सारखा मोठा लेखकही कोणतीही भूमीका घेत नाही हे सत्य आहे

आता वेळ आहे ती भारताची .. थोर महर्षी व्यास यांच्यापासून साहित्य परंपरा असुनही भारत जगाचे सांस्कृतिक नेतृत्व करु शकला नव्हता त्याचे कारण भारत दीर्घकाळ परचक्राखाली राहीला आहे …

मात्र कदाचित हीच वेळ आहे की भारताने आधी आपल्या समाजात उच्च मूल्ये निर्माण करण्यासाठी नवे मन निर्माण करुन वैश्विक सांस्कृतिक नेता बनावे तशी काळमीमांसा दर्शविते आहे.. यावेळीही जर ते नाही झाले तर कदाचित पुर्ण विश्वच अराजकीय संस्कृतीच्या विषाणूने ग्रस्त होइल आणि भारतीय साहित्य विचार तत्वज्ञान पुन्हा एकदा मोठी संधी गमावेल.

मुलाखतकार : डाॅ. अनिल..अतिशय स्पष्ट व थेट अनिल सरमळकर शैलीतच तुम्ही मोकळेपणाने आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या वाचकांसाठी आपला वेळ दिलात व विचार मांडलेत म्हणून संपूर्ण समूहातर्फे तुमचे विशेष धन्यवाद.
अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा सनीबॅन्कर तुफान गाजणारच यात शंका नाही परंतु “द फाॅक्स” तळागाळात पोचावे म्हणून विशेष शुभेच्छा…धन्यवाद डाॅ. अनिल सरमळकर.

डाॅ अनिल सरमळकर: तुम्हा सर्वांच्या डोळे उघडे ठेवून मिळणार्या प्रेम व प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद…आणि सनीबॅन्कर व फाॅक्स यासोबतच आणखीन आगामी प्रकल्प मी वेळोवेळी घोषीत करेनच.
धन्यवाद.

टीम आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल | मुलाखत :
गेली वीस वर्षे अथकपणे सामाजिक परिवर्तन चळवळ साहित्य काव्य कला रंगभूमी तत्वज्ञान संगीत समीक्षा वैचारीक लेखन यांचा अहोरात्र ध्यास घेत प्रवाहाच्या विरोधी प्रवास करत असंख्य अडचणी अवहेलना उपेक्षा यांचा सामना करत अनिल जिजाबाई तुकाराम कांबळे अर्थातच डॉ. अनिल सरमळकर हा लेखक विपुल लेखन करूनही त्यांच्या जगप्रसिद्ध ' द फॉक्स ' नाटकामुळे जागतिक साहित्य रंगभूमी आणि बुद्धीमंत वर्तुळाच्या क्षितिजावर आज झळकत आहे तसेच महान भारतीय अभिनेते महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांनी अनिल यांच्या लिहिलेल्या ' सनी बॅंकर ' या चित्रपट कथेचे कौतुक करुन स्वतः भूमिका करण्यास होकार दिल्याने अनिल सरमळकर हे नाव पुन्हा एकदा प्रचंड चर्चेत आले.

गेले वीस वर्षे ,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा शहर व परिसरात एक वेगळीच शांत ध्येयाची मूक ऊर्जा घेऊन आणि खांद्याला शबनम लावून पायपीट करत धडपडणारा एक साध्या चणीचा युवक हजारो जणांनी पाहिलेला होता. पण हा नेमका कोण आहे …हा असा शांत झपाटलेला का असतो…हा अबोलही का असतो वगैरे प्रश्नांची उत्तरे मात्र लोकांना मिळत नव्हती.
पण 'द फाॅक्स' या त्याच्या पुस्तकाला तथा नाटकाला धडाधड आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि नामांकने मिळू लागली तेंव्हा त्या शांतचित्तामधला धगधगता ज्वालामुखी जगाने जाणला.

नुकताच त्यांनी लेखन व दिग्दर्शन केलेला सनीबॅन्कर मध्ये दस्तुरखुद्द महानायक अमिताभ बच्चन भूमिका निभावणार असल्याचे कळताच डाॅ. अनिल सरमळकर यांच्या प्रायोगिक,सामाजिक व व्यावसायिक अशा तिन्ही क्षमतांची ओळख कला क्षेत्राला होत आहे.

नाटक कादंबरी समीक्षा काव्य तत्वज्ञान संगीत याचा वैश्विक आवाका पेलणार्या या लेखकाचा गेल्या वीस वर्षांचा प्रवास खूप खडतर आणि वेदनादायी तेवढाच प्रेरणादायी आहे. अलीकडेच अमेरिकेतील इंडियाना युनिव्हर्सिटीतील इंग्रजीचे प्रोफेसर समीक्षक लेखक ज्युडीथ ब्राउन यांनी त्यांचे लेखन वाचुन म्हणाले आहेत, '' अनिल नकीच येत्या काही काळात नोबेल प्राईझच्या रांगेत असतील असे त्याचे लेखन आहे अनिल नोबेलसाठी सुटेबल बॉय आहे . असेच प्रशस्तीपत्र त्याना ज्येष्ठ फिल्ममेकर समीक्षक
सौमित्र चॅटर्जी यानीही दिले आहे
त्या पार्श्वभूमीवर आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलचे संस्थापक व मुख्य संपादक सुयोग पंडित यांनी डाॅ. अनिल फाॅक्स सनीबॅन्कर तथा डाॅ. अनिल सरमळकर यांच्याशी साधलेला हा संवाद.
……………………………..

प्रश्न : डाॅ . अनिल..तुमचे मनापासून स्वागत आहे. सध्या आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्वांकडून तुमचे नाव चक्क नोबेलसाठी घेतले जात आहे…..ही तुम्हाला अतिशयोक्ती वाटते किंवा खोटी प्रशंसा वाटते की आणखीन
काय वाटते तुम्हाला याबद्दल?

डाॅ अनिल : खरोखरच हे अविश्वसनीयच असे आहे.
आपल्या देशात खुप श्रेष्ठ कवी लेखक आहेत व आधीही झाले आहेत मात्र त्या तुलनेने मी खूप नवखा लहान आहे माझे लेखन अजुन खुप व्हायचे आहे.
मात्र मी लिहित राहणे यालाच महत्व देतो पण लेखन जागतिक स्तरावर पोहचत आहे त्याची दखल घेतली जात आहे हे खुप महत्त्वाचे आहे… आदरणीय सौमित्र चॅटर्जी सर आणि आता सन्माननीय ज्युडिथ सर यांनी माझ्या लेखनाला पुढे कदाचित नोबेल मिळु शकेल असे जे म्हणालेत त्या बद्दल मी काय आणि कसे बोलू? त्यांनी दिलेले हे प्रोत्साहन आहे त्यांचे मन मोठे आहे खुप.. अर्थात माझ्यावरील जबाबदारी तेवढीच मोठी आहे हे लक्षात येत आहे .. पण इतर गोष्टींकडे लक्ष देण्याआधी लिहित राहण आणि नोबेल च्या रांगेत राहणं मला आवडेल.
अगदी ते नाही मिळणार तरीही.
नोबेल…व्हाय नाॅट…? आय वुड डेफिनेटली बी लाईक टू बी वन ऑफ द नाॅमिनीज् ॲटलीस्ट.
( डाॅ. अनिल स्मितहास्य करत आत्मविश्वासाने म्हणतात)

प्रश्न : इथवरच्या प्रवास सोपा निश्चितच नव्हता.. कसा होता
हा प्रवास तुमचा ?

डाॅ.अनिल: गेली वीस वर्षे एक एक क्षण मी अस्वस्थ राहिलो आहे आपुलाच आपणाशी असं जगणं. अविरत
कविता कलेचा विचारांचा ध्यास
आणि व्यवहाराचे असंख्य चटके वेदना निराशा एकाकीपणा अती आक्रमकपणा आणि अतीकाव्यमय जगण्याने येणारा
आउटसायडरपणा आणि अनेक वैचारीक वावटळी स्वतामधे झेलत अपमान बदनामी झेलत हे भयाण म्हणावं असं जगणं होतं
माझं त्या दरम्यान झालेले प्रचंड लेखन जे आजही अप्रकाशित आहे.
या काळात आई आणि बहीण या दोघांनी खूप समजुन घेतले मित्र नव्हतेच जे होते ते मनःस्ताप देणारे होते पण मोजके अपवादही होते माझ्या स्वताच्याच आणि स्वतःच्याच गावच्या लोकांनी मला प्रचंड दु:ख दिले. तरी विनाकारण मी त्यांच्याच भल्याचा विचार करत होतो …
आणि साहित्य क्षेत्रात माझी ठरवुन माझ्याच जातीतील आणि इतर जातीतील लोकांनी उपेक्षा आणि बदनामी केली…

कदाचित अमेरिका इंग्लंड येथील साहित्य कला रंगभूमीवरील ग्रेट लोकांनी माझी दखल घेतली नसती तर मी आजही कदाचित अंधारातच राहिलो असतो…

प्रश्न : ज्या ' द फॉक्स ' मुळे तुम्ही पूर्ण जागतिक रंगभूमीवर प्रकाशात आलात ते नाटक काय आहे ?

डाॅ.अनिल : मी मुळात आधुनिक आणि उत्तर - आधुनिक प्रवाहातील लेखक आहे आणि जागतिक साहित्य आणि तत्वज्ञान चा विद्यार्थी आहे त्यामुळे मी साचेबद्ध आणि झापडबंद विचात करत नाही त्यामुळेच भारतीय रंगभूमी आणि साहित्य यांचे सारे ठोकताळे तोडुन आणि उत्तर आधुनिकतेच्या विखंडन प्रवाहाचा विचार करुन एकुण जागतिक नाटकाच्या परिपेक्षात हे नाटक वेगळे आहे ते एकूण मानवाच्या प्राक्तनाबद्दल बोलते तेवढेच त्याला आधुनिक आणि उत्तर आधुनिक साहित्याचे संदर्भ आहेत भव्यता शोकात्मिका आणि अराजकाचा भयंकर जीवघेणा खेळ आहे हे नाटक …

प्रश्न : आता सध्या ज्याची भारतीय व्यावसायिक वर्तुळात चर्चा आहे अशा सनी बॅंकर ' बद्दल काही सांगू शकाल…शक्य असेल तर. कारण प्रकल्प संपूर्ण व्यावसायिक आहे..

डाॅ अनिल सरमळकर: (थोडा पाॅज घेत )….ते जणु स्वप्न आहे सर .. ती एक ब्लॅक कॉमेडी.. सटायर आहे आणि त्यात मॅजिक रियॅलिजमही आहे साक्षात बिग बी यांना समोर ठेवून लिहिलेली ही कथा आहे सर ..
ती पडद्यावर येईल तेव्हा अचंबित करणारी असेल मी कल्पकतेला बेछूट सोडले आहे या कथेमधे पण बोचरे आणि हसवणारे भाष्य करताना ही कथा आजच्या समाज व्यवस्थेबद्दल बोलते.. ही कथा व्हीएफएक्स ची मोठ्या प्रमाणावर मागणी करणारी आहे… प्राथमिक गोष्टी पार पडत आहेत .. बिग बी म्हणजे आम्हा कलाकारांचा साक्षात विठ्ठल… त्यांना माझी ही कथा आवडली हेच माझ्यासाठी माझ्या लेखन प्रवासातील एक भव्य घटना आहे एक दिलासा आणि बळ देणारी गोष्ट आहे …

प्रश्न : तुम्ही केवळ एका विशिष्ट गटाचे समाजाचे जस्तीचे विचारसरणीचे नाही आहात लेखक म्हणुन
कसे जमते हे तुम्हाला ?

डाॅ अनिल: लेखक नसतोच कधी एका गटाचा समुहाचा आणि त्याने असुही नये कधी … सांगतो
माझ्या आई बाबांनीच मला पहिल्यापासुन वाचण्याचे स्वातंत्र्य दिले.. ते अडाणी असूनसुद्धा त्यांनी मला अभ्यास करायला खुप मोकळीक दिली त्यांचे उपकार सर्वात मोठे आहेत आणि लहानपणी आजीने दिलेले धडे नेहमीच मदतीला आलेत आणि नंतर मी भारतीय साहित्य आणि जागतिक साहित्य लॅटीन अमेरिकन फ्रेंच जर्मन साहित्य पिंजून काढले.. त्याशिवाय संत कवीता जागतिक कविता संगीत सिनेमा चित्रकला शिल्पकला रंगभूमी जे जे मिळेल ते वाचत गेलो त्या नंतर एक कवी आणि लेखक म्हणुन मी एका वर्गाचा राहुच शकलो नाही ..

प्रश्न : लेखक म्हणुन समाजाला काही संदेश देणार ?

डाॅ.अनिल: भौतिक समृद्धी आणि विषमता आणि सर्व प्रकारचे अराजक आज निर्माण झाले आहे. प्रशांची रेडीमेड उत्तरे शोधु नका त्याना सामोरे जायला हवे आहे ..
संस्कृतीनेच जगभर भयावह समस्या निर्माण केल्या आहेत त्यासाठी त्यातील जे कालबाह्य आणि जीर्ण आहे ते सोडण्यासाठी जो आंतरिक संघर्ष मानव जातीला करायचा आहे त्याची आता कठीण वेळ आली
आहे .. मानव्याचे जतन करण्यासाठी पुन्हा एकदा पसायदान प्रत्यक्षात मागायला हवे आहे … अगदी मनापासुन …
ज्ञानदेव आपले आडनाव काय आहे यावरुन नाही समजत न्यानदेव एक अमृतानुभव आहे
न्यानेश्वर सर्व काही आहे बंडखोर महाकवी युगप्रवर्तक युगधारक
आणि सांस्कृतिक क्रांतीचा उद्गाता… आपण पसायदान लबाडीने मागितले म्हणुन आज
एक लबाड आणि सवंग आणि हिणकस सर्वांगाने दरिद्री समाज निर्माण केला आहे जो विनाशास पात्र आहे ….

ज्ञानदेव माझे आणि माझ्या कवी लेखक असण्याचं विराट संचित आहे … त्यानेच तर मला दुसरा मराठी महाकवी दिला .. नामदेव ढसाळ.

प्रश्न: आता जाता जाता एक प्रश्न. समाज साहित्य आणि आजचे बदलले जग या बद्दल तुमचे विचार काय आहेत ?

डाॅ.अनिल: सर आज संपूर्ण मानवी समाज एका अपरिहार्य अशा सांस्कृतिक घुसमटीतुन जात आहे. हे सांस्कृतिक संक्रमण आहे की हा जगातील सर्व विचारसरणी धर्म तत्वे पंथ साहित्य कला यांचा साचलेला तुंबारा आहे की त्यातून काही एक नव्या युगाची निरगाठ आहे ती सुटणार आहे हे समजणे अंधुक झाले आहे. आजही भल्या भल्या विचारवंत बुद्धीमंत तत्वज्ञानी कवी महाकवी लेखक महालेखकांना उमजत नाहीये की या काळाचे प्रेडिक्षन काय आहे
याचा स्पष्ट निर्वाळा काय आहे ..
आपण मानवी समाजाला त्या त्या देशात त्या त्या देशांच्या संस्कृती परंपरा आणि असामासिक तत्वांच्या आत कोंडुन ठेवले आहे आणि केवळ हजारो वर्षे केवळ व्यवहारासाठी भौतिक प्रगतीसाठी आणि युद्धे करण्यासाठी जगाशी संपर्क ठेवला त्याचे आजचे स्वरूप म्हणजे आजचे हे आधुनिक उत्तर आधुनिक जागतिकीकरण….
सर्व सुखे आणि सुविधा एवढ्याचसाठी आजही आपण विद्न्यान आणि तंत्रज्ञानाचा विचार करतो आणि आभाळाला टेकतील एवढे साहित्य तत्वज्ञान आणि धर्माची पुस्तके निर्माण केली मात्र नव्या मानवी समाजाला नवी रचना आवश्यक आहे याचा विचारच केला नाही आपण यामध्ये आपण केवळ भारतीय लोक नाही तर सर्वात जास्त युरोप आणि इतर संस्कृती आणि देश याला जबाबदार आहेत कारण विखंडित मानव निर्माण करण्याचे घोर पाप औद्योगिक क्रांती नंतर युरोपने केले आहे .. नवा समतोल समाज समतोल माणुस निर्माण न करता केवळ औद्योगिकीकरणाच्या महा राक्षसी भुकेपोटी आणि अहोरात्र शोषण करणाऱ्या निर्दयी अमानुष भांडवलदारीसाठी तिला जगवण्यासाठी सर्व सुखे सुविधा वासनांसाठी वखवखलेला सैतानाने भारलेला मानव समाज आपण निर्माण केला आहे
आणि केवळ प्रत्येक गोस्ट विकत घेण्यासाठी आणि विकण्यासाठी आपण कला साहित्य तत्वज्ञान विद्न्यान आणि तंत्रज्ञानही आपण विकायला काढले आहे …
म्हणूनच कला साहित्य आणि तत्वज्ञानाची भूमिकाच संपवली गेली आहे त्यांचा आता या उत्तर आधुनिक काळात अंत झाला आहे ….

या भयाण विक्राळ वैश्विक चक्रातून जगाला बाहेर काढण्याची ताकद आजही उदात्त असणाऱ्या भारतीय विचारांत आहे. मात्र भारतीय समाज केवळ या उदात्त मुल्यांचा उदघोष करत राहिला आणि प्रत्यक्षात मात्र विषम आणि अन्याय समाज व्यवस्थेचे समर्थन करत राहिला आजवर त्यामुळेच आजही भारतीय विचारांत महाकाव्ये उपनिषदे वेद विवेकानंद बुद्ध न्यानेश्वर संत तुकाराम आणि समग्र संत काव्य परंपरा हे विराट मानवीय सृष्टीचे विचार भारतालाच नव्हे तर जगाच्या साहित्य कला आणि सांस्कृतीकतेचे तारक ठरु शकतात किवा नवा आवश्यक तो रेनेसान्स, युगारंभ घडवुन आणु शकतात…
युरोपिय समाजात होमर पासून शेक्सपियर ते टॉल्स्टॉय गॉर्की ते हेमिंग्वे ते सॅमुएल्स बेकेट अल्बर्ट काम्यू ते जेम्स जॉईस ते रॉबर्तो बोलॅनो मुराकामी असा खुप प्रचंड व्यापक पट असला तरी
आणि महाकाय तत्वज्ञान परंपरा असली तरी आज विश्व साहित्य अपवाद सोडला तर कोणतीही भूमिका न घेता लेखन केले जात आहे केवळ उत्तर आधुनिकतेच्या गोंडस नावाखाली.. मुराकामी सारखा मोठा लेखकही कोणतीही भूमीका घेत नाही हे सत्य आहे

आता वेळ आहे ती भारताची .. थोर महर्षी व्यास यांच्यापासून साहित्य परंपरा असुनही भारत जगाचे सांस्कृतिक नेतृत्व करु शकला नव्हता त्याचे कारण भारत दीर्घकाळ परचक्राखाली राहीला आहे …

मात्र कदाचित हीच वेळ आहे की भारताने आधी आपल्या समाजात उच्च मूल्ये निर्माण करण्यासाठी नवे मन निर्माण करुन वैश्विक सांस्कृतिक नेता बनावे तशी काळमीमांसा दर्शविते आहे.. यावेळीही जर ते नाही झाले तर कदाचित पुर्ण विश्वच अराजकीय संस्कृतीच्या विषाणूने ग्रस्त होइल आणि भारतीय साहित्य विचार तत्वज्ञान पुन्हा एकदा मोठी संधी गमावेल.

मुलाखतकार : डाॅ. अनिल..अतिशय स्पष्ट व थेट अनिल सरमळकर शैलीतच तुम्ही मोकळेपणाने आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या वाचकांसाठी आपला वेळ दिलात व विचार मांडलेत म्हणून संपूर्ण समूहातर्फे तुमचे विशेष धन्यवाद.
अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा सनीबॅन्कर तुफान गाजणारच यात शंका नाही परंतु "द फाॅक्स" तळागाळात पोचावे म्हणून विशेष शुभेच्छा…धन्यवाद डाॅ. अनिल सरमळकर.

डाॅ अनिल सरमळकर: तुम्हा सर्वांच्या डोळे उघडे ठेवून मिळणार्या प्रेम व प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद…आणि सनीबॅन्कर व फाॅक्स यासोबतच आणखीन आगामी प्रकल्प मी वेळोवेळी घोषीत करेनच.
धन्यवाद.

टीम आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल

error: Content is protected !!