वैभववाडी तालुक्यातील शिवसेनेच्या विभागीय बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद
कोळपे,कोकिसरे,लोरे जि. प. विभागाची बैठक संपन्न
आ.वैभव नाईक,सतिश सावंत,संदेश पारकर, संजय पडते, अतुल रावराणे,सुशांत नाईक,निलम सावंत यांची प्रमुख उपस्थिती
वैभववाडी | प्रतिनिधी : स्थापनेपासूनच शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष असला तरी सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे काम शिवसेनेने केले आहे. जो लढतो त्यांच्या मागे जनता उभी राहते. राणेंच्या विरोधात मी लढलो म्हणून लोकांनी मला स्वीकारलं. सध्या भाजपमध्ये प्रवेश करा किंवा जेल मध्ये जा हे दोन पर्याय विरोधकांसमोर आहेत. शिवसेना फोडून महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा डाव काही परप्रांतीयांकडून आखला जात आहे.त्यामुळे परप्रांतीयांपासून महाराष्ट्र वाचविण्यासाठी शिवसैनिकांनी योगदान द्यावे. उद्धवजी मुख्यमंत्री पदाचा त्याग करताना लोकांच्या डोळ्यात अश्रू होते.या अश्रुंची किमंत भाजपला मोजावी लागणार आहे असा इशारा कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.वैभववाडी तालुक्यातील कोळपे,कोकिसरे,लोरे या जिल्हा परिषद विभागाची बैठक शनिवारी सायंकाळी आमदार वैभव नाईक,माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत,शिवसेना युवानेते संदेश पारकर,जिल्हाप्रमुख संजय पडते,शिवसेना नेते अतुल रावराणे,युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,महिला जिल्हा संघटक निलम सावंत, उपजिल्हाप्रमुख नंदु शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, माजी युवासेना जिल्हाप्रमुख ॲड.हर्षद गावडे,माजी सभापती लक्ष्मण रावराणे,युवासेना चिटणीस स्वप्निल धुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
याप्रसंगी सतीश सावंत म्हणाले, आज जे शिवसेना पक्ष सोडून गेले त्यांना गद्दार नाव पडले आहे. त्यामुळे गद्दारी मध्ये आपण सामील होता नये. उद्धवजी आहेत तीच खरी शिवसेना आहे. आज देशात महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर गगनाला भिडले आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्प्पट होण्याऐवजी शेतकऱ्यांचा खर्च दुप्पट झाला आहे.उद्धवजी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षाच्या काळात एकही दंगल झाली नाही.सर्वांना सोबत घेऊन त्यांनी काम केले.कर्जमाफी नुकसान भरपाई च्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांनी न्याय दिला. संदेश पारकर म्हणाले, सर्व शिवसैनिकांनी शिवसेनेला मोठी करण्यासाठी जपण्यासाठी मेहनत करणे गरजेचे आहे.शिवसेनेच्या संकटाच्या काळात शिवसैनिक नेहमी शिवसेनेच्या पाठीशी ठाम राहिला आहे. संघर्षाचा वारसा शिवसेनेने जपला आहे.ज्यांनी ज्यांनी बंड केले त्यांना त्यांची जागा जनतेने दाखवली. असे श्री पारकर यांनी सांगितले.
संजय पडते,अतुल रावराणे यांनीही शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना येत्या काळात शिवसेना संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने मेहनत घेतली पाहिजे.कोणीही कसलीही आमीषे दिली तरी ती धुडकावून लावली पाहिजेत. सदस्य नोंदणीवर भर दिला पाहिजे.होऊ घातलेल्या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. निवडणुकांमध्ये विजय मिळवून उद्धवजींचे हात आपल्याला बळकट करायचे आहेत असे आवाहन केले.
कोळपे येथे उपतालुकाप्रमुख सुरेश पांचाळ,राजेश रावराणे, विभागप्रमुख जितू तळेकर,युवासेना विभागप्रमुख आकाश गुरव, राजेश पवार, विशाल रावराणे,ज्ञानेश्वर फोंडके, बाबा मोरे, समीर लांजेकर,
कोकिसरे येथे मार्गदर्शक भाई सरवणकर, माजी सभापती रमेश तावडे,विभागप्रमुख विठोजी साळुंखे, संभाजी रावराणे,रमदूल पाटणकर, ,उपविभाग प्रमुख राजेश तावडे, अनंत नादसकर,चंदू आमरसकर, यशवंत गवाणकर, नारायण गुरव, तुकाराम गुरव, बाळू पवार, श्रीकांत डाफळे, बाळा पाळये, उज्वला राणे, समाधान काडगे, श्रीराम शिंगरे,
लोरे येथे विभागप्रमुख विलास नावळे, विजय रावराणे, गणेश पवार, महिला तालुकाप्रमुख नलिनी पाटील,प्रवीण गायकवाड, महेश रावराणे,माजी जी. प. सदस्य दिव्या पाचकुडे,अनिल रावराणे, विलास पेडणेकर, विनोद पेडणेकर, संजय सुतार, संतोष शिंदे, देऊ मांजलकर, आत्माराम मांजलकर, अनिल नारंग,बाबा सुतार, धुळाजी काळे, रोहन रावराणे, नारायण म्हादळे, सुरेखा परब, मंदार रावराणे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.