मालवण | विनीत मंडलिक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
या अंतर्गत आठवडाभर विविध कार्यक्रम राबविण्यात आले होते. विज्ञान विभागा मार्फत “आजादीका अमृत महोत्सव ” सांगता समारंभा निमित्त “पावनखिंड” या ऐतिहासिक चित्रपटाचे मोठ्या दिमाखात आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरवात प्राचार्या उज्ज्वला सामंत यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करुन झाली. इतर मान्यवर प्राध्यापकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पावनखिंड हा चित्रपट सर्व विदयार्थ्यांना दाखविण्यात आला. चित्रपटानंतर सामूहिक राष्ट्रगीताने अमृत महोत्सवाची सांगता करण्यात आली.
विज्ञान विभाग प्रा. संकेत बेळेकर व इतर सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आजादीका अमृत महोत्सव कार्यक्रमाचे
आयोजनव नियोजन करण्यात आले होते. उत्तम नियोजन व विदयार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे यामुळे अमृत महोत्सव सांगता समारंभ यशस्वीपणे संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन विज्ञान विभाग प्रा. संकेत बेळेकर यांनी तर आभार प्रा.डाॅ. सुमेधा नाईक यांनी मानले.