तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी प्रभाकर साळसकर यांची फेर बिनविरोध निवड..!
संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
देवगड तालुक्यातील साळशी ग्रामपंचायतीच्या १७ ऑगस्टच्या ग्रामसभेत विविध विकास कामांवर चर्चा करण्यात आली असून या सभेत या गावचे सरपंच वैभव साळसकर यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम शासनाच्या आदेशाप्रमाणे योग्य नियोजन करून संबंधित घटकांना सामाविष्ट करून व सहकार्यातून तसेच ग्रामस्थांच्या सहभागातून यशस्वी केला याबद्दल माजी सरपंच तथा माजी पं. स. सदस्य सुनील गावकर यांनी गावच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच उपसरपंच व सदस्य यांचाही सत्कार करण्यात आला.ही ग्रामसभा १७ ऑगस्टला सायंकाळी ३.३० वाजता माळवदे हाॅल येथे सरपंच वैभव साळसकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यावेळी विविध विकास कामांवर चर्चा करण्यात आली. म. गांधी रोजगार हमी योजना आराखडा करण्यात आला. महात्मा गांधी तंटामुक्ती ची फेररचना करण्यात आली असून अध्यक्ष प्रभाकर साळसकर यांची फेर बिनविरोध निवड करण्यात आली. विद्युत वितरण विभागाच्या कामाबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच आदी गावाच्या विकासाबाबत चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात आला.
या सत्कार प्रसंगी सरपंच वैभव साळसकर यांनी गावाच्या विकासासाठी माझा कायम सहभाग असून सहकार्य असेल असे सांगितले.
या ग्रामसभेत सरपंच वैभव साळसकर ,उपसरपंच अनंत नाईक ,ग्रा प सदस्य, ग्रामसेवक मनिषा मांडे, पोलीस पाटील कामिनी नाईक ,अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, ग्रा प कर्मचारी, बचतगटाचे सदस्य, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या ग्राम सभेला ११० ग्रामस्थ उपस्थित होते .ही ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.