संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
हनुमान युवक क्रीडामंडळ देवगड आयोजित कॅरम स्पर्धेमध्ये खुल्या गटामधून सनित आचरेकर तर शालेय गटामधून आराध्य चौगुले यांनी यश संपादन केले आहे. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
हनुमान युवक क्रीडामंडळ देवगडच्या वतीने अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शासकीय कार्यक्रमांतर्गत देवगड तालुका मर्यादित खुल्या व शालेय गटासाठी कॅरम स्पर्धा प्राथमिक शिक्षक भवन देवगड येथे दिनांक १५ ऑगस्टला आयोजित करण्यात आल्या होत्या.
सदर स्पर्धेचे उदघाटन देवगड जामसंडे नगर पंचायतच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू व देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष निशिकांत साटम यांचे हस्ते दीपप्रज्वलंन करून करण्यात आले. या प्रसंगी सर्वश्री नगरसेवक नितीन बांदेकर, विशाल मांजरेकर,भास्कर कुबल, उद्योगपती हनीफशेठ मेमन, शिवा पेडणेकर इत्यादी उपस्थित होते. सदर स्पर्धेला नगरसेवक संतोष तारी, मुख्याधिकारी कौस्तुभ गवाणे, प्रकाश गोगटे, प्रशांत वारिक, जामसंडे संमित्र मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ भुजबळ व मान्यवर व्यक्तीनी सदिच्छा भेट दिली.
सदर स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
खुला गट :- प्रथम क्रमांक सनित आचरेकर,द्वितीय क्रमांक कु. सिद्धीका खान ,उत्तेजनार्थ १) योगेश कोळी, २) श्री. संदीप राणे
शालेय गट प्रथम क्रमांक आराध्य चौगुले, द्वितीय क्रमांक वेदांत बेलकर , उत्तेजनार्थ १) राहुल कांदळगांवकर २) चिन्मय जाधव
सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण देवगड तहसीलदार मारुती कांबळे, माजी आमदार ॲड. अजितराव गोगटे, मंडळाचे अध्यक्ष विलास रुमडे, उपाध्यक्ष उल्हास मणचेकर, माजी अध्यक्ष विजय जगताप, सदस्य हनीफशेठ मेमन, सदानंद सावंत यांचे हस्ते करणेत आले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक अध्यक्ष विलास रुमडे, सूत्रसंचालन सचिव शरद लाड आभार उल्हास मणचेकर यांनी मानले. तर कार्यक्रम यशस्वी होणेसाठी विजय जगताप, सदानंद सावंत, उमेश बिडये, सुरेंद्र लांबोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.