बॅ. नाथ पै. सेवांगण कट्टा येथे पुस्तक प्रदर्शन व जीवनावश्यक वस्तू वाटप.
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
बॅ. नाथ पै .सेवांगण कट्टा येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.रोटरी क्लबच्या माजी अध्यक्षा संध्या समुद्र यांचे हस्ते ध्वजारोहण झाले.विद्या कुलकर्णी यांचे हस्ते पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.रश्मी पाटील यांचे हस्ते नवीन शिवण वर्गाचे उद्घाटन झाले.

चित्रकार हरेश चव्हाण, लक्ष्मण भिसे आणि ॲड. संजय खेर यांचे हस्ते दीपक भोगटे यानी रेखाटलेल्या ७५ चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. सर्व मान्यवरांचे हस्ते ३० गरजूना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
संध्या समुद्र व विद्या कुलकर्णी यांनी या सुंदर उपक्रमाविषयी सेवांगणला यावेळी धन्यवाद दिले.आकेरकर सर यांनी दीपक भोगटे हा माझा विद्यार्थी असून त्याची ही चित्रकला त्याने स्वकष्टाने जपल्या बद्दल कौतुक केले.
मुंबई हायकोर्टाचे ॲड .संजय खेर यांनी या सुंदर सोहळ्याला उपस्थित राहाण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
कलाकार हरेश चव्हाण यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण भाषणात जिद्द असेल तर माणूस काय करू शकतो याचे दीपक भोगटे हे उत्तम उदाहरण आहे. सर्वांनी जिद्दीने आवडीने एखादी कला जोपासल्यास जीवन आनंदी होईल असं सांगितलं. दीपक भोगटे यांनी स्वातंत्र लढ्यातल सर्व हुतात्म्याना आदरांजली वाहिली किशोर शिरोडकर व प्रसाद परुळेकर यानी स्वातंत्र्याच्या लढा व त्यातील अनेकांचे योगदान याची माहिती दिली.
मिथिला नागवेकर व आकेरकर सर यांनी दोन गरीब गरजू महिलांना
शिवणयंत्रे भेट दिली. माजी सैनिक कदम सहकार संस्था सचिव अ. द सावंत,पतपेढी कर्मचारी विद्या चिंदरकर, ग्रामसेवक प्रकाश सरमळकर यांचा सत्कार करण्यात आला.
गुणवंताचा बक्षीस समारंभ इत्यादी कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मानसी तळवडेकर हिने केले. या मान्यवरां सोबतच
किशोर शिरोडकर, श्याम पावसकर, दीपक भोगटे, बापू तळावडेकर, सुभाष म्हाडगुत, समीर चांदरकर, काळे सर, प्रसाद परुळेकर, गावकर सर, विशाल वाईरकर, डॉ गोपाळ सावंत, चित्रा साटविलकर, सौ नाईक,
सौ. झाट्ये, मधुरा माडये, संजय पावसकर, जितेंद्र महाभोज, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.