संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
देवगड तालुक्यातील फणसगाव कला व वाणिज्य महाविद्यालय फणसगाव या महाविद्यालयातर्फे संपूर्ण भारत देशामध्ये देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे या निमित्ताने हर घर तिरंगा ‘मोहिमेत सर्व शाळा, महाविद्यालये, प्रशासकीय कार्यालये तसेच नागरिक यांच्यामार्फत राबवली जात आहे
या मोहिमेचा भाग म्हणून फणसगाव कला व वाणिज्य महाविद्यालयामार्फत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याकरिता’ तिरंग्याचे महत्त्व’हे पथनाट्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केले या पथनाट्यात विद्यार्थ्यांनी प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा का लावावा याचे महत्त्व सांगितले तसेच १५ ऑगस्ट नंतर या झेंड्याचा नागरिकांकडून अनव धानाने अपमान जनक वापर केला जातो हा गैरवापर टाळावा, आणि तिरंग्याचा आदर राखला जावा याकरिता विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून ध्वजसंहिता आणि ध्वज उतरल्यानंतर त्याची व्यवस्थित जपणूक कशी करावी याबाबत पथनाट्यातून जनजागृती करण्याचे काम’
‘हर घर तिरंगा अभियान भारताची वाढवेल शान ‘असे संदेश देऊन पथनाट्याची सांगता करण्यात आली हे पथनाट्य उंडील तिठा ,फणसगाव कॅन्टीन या ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य सौ.अनुश्री नारकर NSS विभाग प्रमुख सौ जानवी नारकर मॅडम महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते या पथनाट्याचे लेखन दिग्दर्शन आणि संचालन प्रा.केतकी पारकर यांनी केले गावातील ग्रामस्थांनी कार्यक्रमासाठी प्राचार्य अनुश्री नारकर तसेच सहाय्यक प्रा.केतकी पारकर यांनी केले गावातील ग्रामस्थांनी कार्यक्रमासाठी प्राचार्य सौ अनुश्री नारकर तसेच सहाय्यक आणि विद्यार्थी यांचे आभार मानले.