कट्टा येथे सेंद्रिय शेती प्रशिक्षण संपन्न..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
सध्या भरमसाट रासायनिक खतांचा शेतात वापर होऊ लागल्याने त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे. त्यामुळे वेळीच आपणास सेंद्रिय शेतीकडे वळल्याशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन कृषि विज्ञान केंद्र, किर्लोसचे विषय विशेषज्ञ डॉ.विलास सावंत यांनी येथे केले.
ग्रामपंचायत वरची गुरामवाडी येथे महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व ग्रामपंचायत वरची गुरामवाडी यांच्या संयुक्त विद्यामाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सेंद्रिय शेती प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. प्रशिक्षणाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलाने करण्यात आली. यावेळी व्यासपिठावर तालुका कृषि अधिकारी विश्वनाथ गोसावी, कृषि पर्यवेक्षक मालवण धनंजय गावडे, कृषि पर्यवेक्षक धामापूर सिताराम परब, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक निलेश गोसावी, कृषि सहाय्यक पवनकुमार सौंगडे, ग्रामपंचायत सदस्या श्रीम. कुबल, माजी सरपंच सतिश वाईरकर, माजी उपसरपंच मकरंद सावंत, ग्रामसेवक एल.डी.सरमळकर, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळद्याच्या कृषिकन्या व शेतकरी वर्ग आदी उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषि सहाय्यक पवनकुमार सौंगडे यांनी केले.