अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत नेरूर ग्रामपंचायतने केला सन्मान..!!
नेरूर । देवेंद्र गावडे
शनिवार । १३ ऑगस्ट २०२२
स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाविषयीचा आनंद व उत्साह तमाम भारतीय नागरिकांमध्ये ओसंडून वाहताना दिसत आहे.
लहान लहान गाव-खेड्यांमधूनही आपल्या भारत देशाविषयीचा जाज्वल्य अभिमान विविध उपक्रमांमधून नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत.
देशहितासाठी सीमेवर तैनात असणारे व अहोरात्र देशहितासाठी प्राण तळहाती घेऊन लढणारे सैनिक हे भारतवासियांसाठी सदैव आदरस्थानी.
आज याच आदरणीय सैनिकांविषयीचा आदरभाव जपताना व त्यांचा सन्मान करताना नेरूर ग्रामपंचायतीच्यावतीने ज्येष्ठ माजी सैनिक सन्माननीय श्री. सुरेश अर्जून वेंगुर्लेकर यांच्या हस्ते ध्वजारोहन करून मानवंदना देण्यात आली.
याप्रसंगी नेरूर ग्रामपंचायत सरपंच शेखर गावडे, ग्रामपंचायत सदस्य महादेव नेवगी, राजन पावसकर, ग्रामविकास अधिकारी वासुदेव कसालकर, कृषी अधिकारी श्री. चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी, सीआरपी, बचत गट अध्यक्ष, आरोग्य विभाग कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.