शिरवंडे येथे शेतकरी दिन विविध उपक्रमांनी साजरा..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती निमित्त शिरवंडे ग्रामपंचायत सभागृहात शेतकरी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मालवण तालुका कृषी अधिकारी श्री. विश्वनाथ गोसावी, उपसरपंच शिरवंडे श्री हरेश्वर घाडी,मंडळ कृषी अधिकारी पोईप अतुल कांबळे, विषयतज्ञ कृषि विज्ञान केंद्र किर्लोस
श्री. बाळकृष्ण गावडे ,कृषि अधिकारी पंचायत समिती मालवण श्री. आर जे कांबळे, मंडळ अधिकारी श्री. शिंगाडे , तलाठी श्री.काटे, कृषी पर्यवेक्षक श्री.डि.के.सावंत, कृषी सहा. श्रीम. जिकमडे, आत्मा व्यवस्थापक श्री. निलेश गोसावी, ग्रामपंचायत सदस्य तसेच बहुसंख्य महिला शेतकरी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी श्री. विश्वनाथ गोसावी यांनी शेतकऱ्यांनी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करावा. शासनाच्या विविध योजना राबवितांना करावयाचा अवलंब तसेच येणाऱ्या अडचणी यावर कशी मात करता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. श्री. अतुल कांबळे यांनी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती निमित्त त्यांच्या कार्याविषयी माहिती देऊन कृषि विभागाकडील योजनांची माहिती दिली. श्री. बाळकृष्ण गावडे यांनी भात पिकावरील किडरोग व करावयाची उपाय योजना बाबत माहिती दिली. मंडळ अधिकारी श्री. राजेंद्र शिंगाडे यांनी ई-पिक पाहणी व महत्व बाबत माहिती देताना सर्वानी नोंदणी करण्याचे आवाहन केले. आत्मा व्यवस्थापक श्री. निलेश गोसावी यांनी प्रधान मंत्री शुक्ष्म अन्न प्रक्रिया योजना बाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. जिकमडे यांनी तर आभार प्रदर्शन श्री. डी. के. सावंत यांनी मानले.