तुफानी वारा पावसाची पर्वा न करता संपन्न झालेला सोहळा.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘बंड्या खोत मित्रमंडळ’ या सामाजिक मित्रमंडळाने, मालवण हडी जवळच्या कालावल जेटीवर नारळी पोर्णिमेचा उत्सव दणक्यात साजरा केला.
या उत्सवाला महिलांची नारळ लढविणे ही स्पर्धा व पुरूषांची नारळ लढविण्याची चुरस ही वैशिष्ट्ये होती.
महिलांच्या नारळ लढविणे स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या सौ.शैलजा उत्तम खांबल तर द्वितीय क्रमांकाची सोन्याची नथ सौ.सुचित्रा खांबल यांना मिळाली. या सासू सुनेच्या जोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तृतीय क्रमांकाची सेमी पैठणी सौ.शैलजा शंकर खोत यांना मिळाली.
या स्पर्धेला समाजसेवक श्री. बंड्या खोत जातीने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांमध्ये आबा खोत,किसन मांजरेकर,दिनेश साळकर, सौ.संजना रेडकर, अनिल खोत, महेंद्र खोत,साईप्रसाद खोत, प्रणय खोत,रणजीत खोत,संतोष पाटील,प्रविण खोत, अंतरा खोत,शैलजा खोत,चिंतामणी खोत,संतोष आचरेकर,पपू कांदळकर आणि इतर मान्यवर व बंड्या खोत मित्रमंडळाचे उत्साही समाज कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रंड पाऊस ,तुफानी वारा आणि सर्व परिस्थिती प्रतिकूल असूनही संपन्न झालेली ही स्पर्धा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय आहे.