विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून, नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन कार्यक्रमानिमित्त वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाच्या वतीने वृक्ष रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाच्या हरित सेना स्काऊट गाईड व एनसीसी विभागामार्फत झाडे लावा झाडे जगवा पुरातन वृक्षांची जोपासना करा असा संदेश देत कट्टा परिसरातील पुरातन पिंपळ वृक्षाला विद्यार्थिनी स्वतः बनवलेली राखी बांधण्यात आली. यावेळी कट्टा बाजारपेठेत विद्यार्थिनी रॅली काढत वृक्ष संवर्धनाच्या घोषणा दिल्या. या रॅलीत इयत्ता दहावीचे विद्यार्थी, प्रशालेतील शिक्षक, मुख्याध्यापक संजय नाईक, कला शिक्षक समिर चांदरकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते, या कार्यक्रमासाठी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर व सर्व संचालक मंडळांनी शुभेच्छा दिल्या.