स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि हर घर तिरंगा उपक्रमा अंतर्गत संपन्न झालेली मोहीम.
मालवण | विनीत मंडलिक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या स. का. पाटील महाविदयालय येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्त ‘हर घर तिरंगा’ या कार्यक्रमा अंतर्गत परिसर स्वच्छता उपक्रम तथा मोहीम राबविण्यात आली.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्त हर घर तिरंगा या कार्यक्रमांतर्गत विज्ञान विभाग व राष्ट्रीय सेवा योजना ( NSS) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण प्रदूषण जनजागृती व महाविद्यालया अंतर्गत परिसर स्वच्छता उपक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमाला लागवड व सामाजिक वनीकरण विभागाचे क्षेत्रपाल मा. श्री शिंदे सर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली .
या कार्यक्रमात लागवड अधिकारी मा. शिंदे सर यांनी पर्यावरण प्रदुषण त्याचे प्रकार व वैज्ञानिक संदर्भ या बद्दल मार्गदर्शन केले.पर्यावरणाचा वैज्ञानिक दृष्टया व सामाजिक दृष्टया समतोल कसा राखावा व प्रदूषण टाळावे याचे मार्गदर्शन केले.तसेच येणारा गणेशोत्सवाच्या सर्वात मोठा सण हा पर्यावरण पुरक साजरा करावा असे आवाहन देखील केले. त्यानंतर लागवड व सामाजिक वनीकरण विभागामार्फत महाविदयालयास काही झाडे भेट म्हणून देण्यात आली.
राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत कार्य. अधिकारी प्रा. शंकर खोबरे सर व प्रा. बी. एच. चौगले सर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय परिसरातील स्वच्छता करण्यात आली. या कार्यक्रमास NSS चे सर्व विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
सदर कार्यक्रमाला प्राचार्य उज्ज्वला सामंत , सर्व शिक्षकवृंद व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विज्ञान विभागाचे प्रा. संकेत बेळेकर तर कार्यक्रमाचे आभार प्रा. कैलास राबते यांनी मानले.
या मोहीमेला विद्यार्थी वर्गाने तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम प्रतिसाद दिला.