25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

‘ प्रेमशल्य ‘ लघुचित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण ;ऑगस्टमधेच होणार युट्युबवर..

- Advertisement -
- Advertisement -

डाॅ.अनिल सरमळकर दिग्दर्शीत कथेचे चित्रीकरण कलंबिस्त गावात झाले आहे..

मालवण | सुयोग पंडित : सावंतवाडी तालुक्यातील नवोदित युवा कथालेखिका गौरी धुरी यांच्या ” मुस्कान ‘ या प्रेमकथेवर
आधारित ‘ प्रेमशल्य ‘ या लघुचित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच सावंतवाडी तालुक्यातील ‘ कलंबिस्त या गावी पूर्ण करण्यात आले आहे.

गौरी धुरी या उगवत्या लेखिकेने लिहिलेल्या कथेवर आधारीत असलेल्या या लघुपटाची पटकथा आघाडीचे तरूण अभिनेते प्रताप तांबुळकर यांनी लिहिली असुन या लघुपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक डॉ. अनिल सरमळकर यांनी केले असुन सह दिग्दर्शक व संगीतकार म्हणुन प्रताप तांबुळकर यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

तर या लघुपटात आजचे कोकणचे आघाडीचे प्रतिभावंत युवा सशक्त अभिनेते शशांक परब यांनी आपल्या सहज नैसर्गिक प्रभावी अभिनायाने स्तिमित केले असुन कलंबिस्त गावचे सुपुत्र हरहुन्नरी कलाकार तरूण अभिनेते मंदार जंगम यांनी आपल्या अभिनयाने या लघुपटाला एका उंचीवर नेले आहे

तर प्रथमच अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणाऱ्या ओटवणे गावाच्या सुकन्या युवा अभिनेत्री कु. श्रध्दा नाईक यांनीही पहिल्याच प्रयत्नात अत्यंत आश्वासक व नैसर्गिक असा अभिनय केला असुन बांदा येथील नवोदित युवा अभिनेत्री कु. गौतमी तारी हीनेही समर्थ अभिनायाने आपल्या भुमिकेला न्याय दिला आहे.
तसेच नितिल नाईक ,अक्षय सावंत ,प्रदीप सावंत ,संतोष तारी , डॉ. लाड सर आदींनीही यामधे महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
तसेच या लघुचित्रपटाचे छायाचित्रण मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रख्यात डीओ पी हर्षल घाटकर यांनी केले केले आहे

ओरान फिल्म च्या वतीने प्रदर्शित होणाऱ्या या लघुपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन अनिल सरमळकर यांनी केले आहे. तसेच कलाकार तंत्रज्ञ यांच्याबरोबरच कलंबिस्त गावच्या ग्रामस्थांनी यावेळी चित्रीकरणा दरम्यान अत्यंत मोलाचे सहकार्य केले आहे.

कलंबिस्त सारख्या सह्याद्रीचा कुशीत वसलेल्या अत्यंत अनुपम निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आणि पावसाळी ऋतूमधे अत्यांतिक हीरवाईने बहरलेल्या या गावात चित्रीकरण करणे ही जशी या कथेची गरज होती तशीच ती चित्रीकरण करतांना मनाला आनंद देणारी गोस्ट होती त्याचप्रमाणे येथील ग्रामस्थांनी जे खुल्या मनाने आमचे स्वागत केले आणि सलग पाच दिवस सहकार्य केले त्या बद्दल आम्ही त्यांचे मनपुर्वक आभारी आहोतच तसेच कलंबिस्त गावचे सुपुत्र कलाकार अभिनेते मंदार जंगम यांचेही त्यांनी केलेले नियोजन आणि सहकार्य याबद्दल आभार मानणे आवश्यक असल्याचे या लघुपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक डॉ. अनिल सरमळकर यानी सांगितले.

‘ प्रेमशल्य ‘ ही आगळी वेगळी प्रेमकथा आहे मात्र ती सर्वसामान्य प्रेमकथा नसुन प्रेक्षकांना एक वेगळाच धक्का आणि संदेश देणाचे सामर्थ्य असणारी कथा आहे. कारण या कथेमधील वळणे आणि शेवटी
सर्वानाच थक्क करुन टाकण्याची ताकद असणारी आणि सदगदीत करुन टाकणारी ही कथा या लघुपटातुन दिसेल

त्याचबरोबर कोकणातील आजचा अत्यंत आश्वासक युवा अभिनेता कु. शशांक परब यांच्या अभिनयासाठी हा चित्रपट पाहणे ही एक पर्वणीच ठरेल. तसेच मंदार जंगम श्रध्दा नाईक गौतमी तारी नितिल नाईक या उमद्या युवा अभिनेत्री अभिनेत्यांचा अभिनय अत्यंत नैसर्गिकपणे लघुचित्रपटात बहरला आहे ते मुळातूनच पहायला हवे आहे.
त्याचप्रमाणे या लघुपटाची पटकथा लिहिणारे प्रताप तांबुळकर हे कोकणच्या मातीतील अष्टपैलू कलाकार असून त्यांनी जो संगीत साज सजवलाय तोही याचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे
असे अनिल सरमळकर यांनी सांगितले व ते पुढे म्हणाले की गौरी धुरी या लेखिकेची ही कथाच मुळात सशक्त आहे. या लेखिकेचे भविष्य लेखान क्षेत्रात नक्कीच उज्ज्वल आहे असे मला वाटते. तसेच ‘ मी प्रेमकथेवर अद्याप कधीही चित्रपट केला नाही, मात्र ही कथा साधी सरळ असली तरी तीचा मतीतार्थ गहन आहे असे मला वाटले आणि या कथेमधील ट्विस्ट तर शेवटी धक्कादायक आहेत आणि आजच्या तरुण पिढीला एक काही शिकवण देणारेही आहेत असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही म्हणुन मला ही कथा लघुपटासाठी निवडावी एक वेगळा जॉनर करावा असे मला वाटले वेगळी कथा करतांना काही शिकायला मिळावे असे सरमळकर म्हणाले तसेच येत्या पंधरा दिवसातच ‘ प्रेमशल्य ‘ हा लघुपट ‘ Oraan film च्या यु ट्यूब चॅनल वर पाहता येइल असेही अनिल सरमळकर यांनी सांगितले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

डाॅ.अनिल सरमळकर दिग्दर्शीत कथेचे चित्रीकरण कलंबिस्त गावात झाले आहे..

मालवण | सुयोग पंडित : सावंतवाडी तालुक्यातील नवोदित युवा कथालेखिका गौरी धुरी यांच्या " मुस्कान ' या प्रेमकथेवर
आधारित ' प्रेमशल्य ' या लघुचित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच सावंतवाडी तालुक्यातील ' कलंबिस्त या गावी पूर्ण करण्यात आले आहे.

गौरी धुरी या उगवत्या लेखिकेने लिहिलेल्या कथेवर आधारीत असलेल्या या लघुपटाची पटकथा आघाडीचे तरूण अभिनेते प्रताप तांबुळकर यांनी लिहिली असुन या लघुपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक डॉ. अनिल सरमळकर यांनी केले असुन सह दिग्दर्शक व संगीतकार म्हणुन प्रताप तांबुळकर यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

तर या लघुपटात आजचे कोकणचे आघाडीचे प्रतिभावंत युवा सशक्त अभिनेते शशांक परब यांनी आपल्या सहज नैसर्गिक प्रभावी अभिनायाने स्तिमित केले असुन कलंबिस्त गावचे सुपुत्र हरहुन्नरी कलाकार तरूण अभिनेते मंदार जंगम यांनी आपल्या अभिनयाने या लघुपटाला एका उंचीवर नेले आहे

तर प्रथमच अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणाऱ्या ओटवणे गावाच्या सुकन्या युवा अभिनेत्री कु. श्रध्दा नाईक यांनीही पहिल्याच प्रयत्नात अत्यंत आश्वासक व नैसर्गिक असा अभिनय केला असुन बांदा येथील नवोदित युवा अभिनेत्री कु. गौतमी तारी हीनेही समर्थ अभिनायाने आपल्या भुमिकेला न्याय दिला आहे.
तसेच नितिल नाईक ,अक्षय सावंत ,प्रदीप सावंत ,संतोष तारी , डॉ. लाड सर आदींनीही यामधे महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
तसेच या लघुचित्रपटाचे छायाचित्रण मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रख्यात डीओ पी हर्षल घाटकर यांनी केले केले आहे

ओरान फिल्म च्या वतीने प्रदर्शित होणाऱ्या या लघुपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन अनिल सरमळकर यांनी केले आहे. तसेच कलाकार तंत्रज्ञ यांच्याबरोबरच कलंबिस्त गावच्या ग्रामस्थांनी यावेळी चित्रीकरणा दरम्यान अत्यंत मोलाचे सहकार्य केले आहे.

कलंबिस्त सारख्या सह्याद्रीचा कुशीत वसलेल्या अत्यंत अनुपम निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आणि पावसाळी ऋतूमधे अत्यांतिक हीरवाईने बहरलेल्या या गावात चित्रीकरण करणे ही जशी या कथेची गरज होती तशीच ती चित्रीकरण करतांना मनाला आनंद देणारी गोस्ट होती त्याचप्रमाणे येथील ग्रामस्थांनी जे खुल्या मनाने आमचे स्वागत केले आणि सलग पाच दिवस सहकार्य केले त्या बद्दल आम्ही त्यांचे मनपुर्वक आभारी आहोतच तसेच कलंबिस्त गावचे सुपुत्र कलाकार अभिनेते मंदार जंगम यांचेही त्यांनी केलेले नियोजन आणि सहकार्य याबद्दल आभार मानणे आवश्यक असल्याचे या लघुपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक डॉ. अनिल सरमळकर यानी सांगितले.

' प्रेमशल्य ' ही आगळी वेगळी प्रेमकथा आहे मात्र ती सर्वसामान्य प्रेमकथा नसुन प्रेक्षकांना एक वेगळाच धक्का आणि संदेश देणाचे सामर्थ्य असणारी कथा आहे. कारण या कथेमधील वळणे आणि शेवटी
सर्वानाच थक्क करुन टाकण्याची ताकद असणारी आणि सदगदीत करुन टाकणारी ही कथा या लघुपटातुन दिसेल

त्याचबरोबर कोकणातील आजचा अत्यंत आश्वासक युवा अभिनेता कु. शशांक परब यांच्या अभिनयासाठी हा चित्रपट पाहणे ही एक पर्वणीच ठरेल. तसेच मंदार जंगम श्रध्दा नाईक गौतमी तारी नितिल नाईक या उमद्या युवा अभिनेत्री अभिनेत्यांचा अभिनय अत्यंत नैसर्गिकपणे लघुचित्रपटात बहरला आहे ते मुळातूनच पहायला हवे आहे.
त्याचप्रमाणे या लघुपटाची पटकथा लिहिणारे प्रताप तांबुळकर हे कोकणच्या मातीतील अष्टपैलू कलाकार असून त्यांनी जो संगीत साज सजवलाय तोही याचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे
असे अनिल सरमळकर यांनी सांगितले व ते पुढे म्हणाले की गौरी धुरी या लेखिकेची ही कथाच मुळात सशक्त आहे. या लेखिकेचे भविष्य लेखान क्षेत्रात नक्कीच उज्ज्वल आहे असे मला वाटते. तसेच ' मी प्रेमकथेवर अद्याप कधीही चित्रपट केला नाही, मात्र ही कथा साधी सरळ असली तरी तीचा मतीतार्थ गहन आहे असे मला वाटले आणि या कथेमधील ट्विस्ट तर शेवटी धक्कादायक आहेत आणि आजच्या तरुण पिढीला एक काही शिकवण देणारेही आहेत असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही म्हणुन मला ही कथा लघुपटासाठी निवडावी एक वेगळा जॉनर करावा असे मला वाटले वेगळी कथा करतांना काही शिकायला मिळावे असे सरमळकर म्हणाले तसेच येत्या पंधरा दिवसातच ' प्रेमशल्य ' हा लघुपट ' Oraan film च्या यु ट्यूब चॅनल वर पाहता येइल असेही अनिल सरमळकर यांनी सांगितले.

error: Content is protected !!