मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त
महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय मालवण, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने कट्टा हायस्कूल येथे तालुका स्तरीय रानभाजी संवर्धन, प्रदर्शन,जनजागृती, पाककृतींचे(स्पर्धेचे) व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन १२ ऑगस्टला सकाळी९.३० वाजता करण्यात आले आहे.
पाककला स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकाना आकर्षक सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येईल. तसेच सहभागी स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिक, प्रमाणपत्र व गिफ्ट दिले जाईल.”रानभाजी पाककला” स्पर्धा सर्वांसाठी खुली असेल. तरी कृपया सर्वांनी रानभाजी प्रदर्शन कार्यक्रमासाठी वराडकर हायस्कूल कट्टा येथे उपस्थित राहून पाककला स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांनी केले आहे.