23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

मसुरेत मोहरम निमित्त ताबूत मिरवणूक…!

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
मसुरे येथे मुस्लिम धर्मियांच्या मोहरम उत्सवाची सांगता मंगळवारी सायंकाळी झाली. मोहरम’ हे इस्लामिक कॅलेंडरमधील पहिल्या महिन्याचे नाव. या महिन्याने इस्लामच्या नव्या वर्षाची सुरुवात होते. मोहरम महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसेन आणि हुसैन हे दोघेही करबला येथे शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मुस्लिम बांधव या दिवशी शोक व्यक्त करतात. मोहरम निमित्त मसुरे बाजारपेठ येथील रफिक शाह वल्ली मोहल्ला आणि मसुरे भरतगड पायथ्या खालील चिस्ती मोहल्ला येथील ताबूत मिरवणुक काढण्यात आले. ठिकठिकाणी सरबत वाटप करण्यात आले. मसुरे येथील मुख्य बाजारपेठ व मर्डे विठ्ठल मंदिर येथे मुस्लिम धर्मीय बांधवांनी फेर धरत प्रार्थना केली. यावेळी मूनवर सय्यद, यासिन सय्यद, इरफान शेख, अजीजुर चिस्ती, खलील चिस्ती, पपु शेख, जमीर चिस्ती, बिलाल शेख, जुबेर शेख, अन्वर शेख, इकबाल शेख, अब्दुल शेख, इम्तियाज शेख,  रिजवा न शेख, इम्रान शेख, यासिन शेख,  दाऊद शेख, नासिर शेख, कैसर शेख, इल्लू शेख, फैजान शेख, एजाज शेख आदी मसुरे, पेमवडे येथील मुस्लिम बांधव, महिला, हिंदू बांधव उपस्थित होते. मसुरे पोलीस प्रमोद नाईक, विवेक फरांदे, होमगार्ड संजय मोरे यांनी वाहतूक नियोजन केले. कोरोनामुळे मगिलवर्षी साध्या पद्धतीने मोहरम साजरा करण्यात आला होता. निर्बंध नसल्याने यावर्षी मोठ्या प्रमाणात मुंबईकर मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. उत्सवाची सायंकाळी उशिरा झाली.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
मसुरे येथे मुस्लिम धर्मियांच्या मोहरम उत्सवाची सांगता मंगळवारी सायंकाळी झाली. मोहरम' हे इस्लामिक कॅलेंडरमधील पहिल्या महिन्याचे नाव. या महिन्याने इस्लामच्या नव्या वर्षाची सुरुवात होते. मोहरम महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसेन आणि हुसैन हे दोघेही करबला येथे शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मुस्लिम बांधव या दिवशी शोक व्यक्त करतात. मोहरम निमित्त मसुरे बाजारपेठ येथील रफिक शाह वल्ली मोहल्ला आणि मसुरे भरतगड पायथ्या खालील चिस्ती मोहल्ला येथील ताबूत मिरवणुक काढण्यात आले. ठिकठिकाणी सरबत वाटप करण्यात आले. मसुरे येथील मुख्य बाजारपेठ व मर्डे विठ्ठल मंदिर येथे मुस्लिम धर्मीय बांधवांनी फेर धरत प्रार्थना केली. यावेळी मूनवर सय्यद, यासिन सय्यद, इरफान शेख, अजीजुर चिस्ती, खलील चिस्ती, पपु शेख, जमीर चिस्ती, बिलाल शेख, जुबेर शेख, अन्वर शेख, इकबाल शेख, अब्दुल शेख, इम्तियाज शेख,  रिजवा न शेख, इम्रान शेख, यासिन शेख,  दाऊद शेख, नासिर शेख, कैसर शेख, इल्लू शेख, फैजान शेख, एजाज शेख आदी मसुरे, पेमवडे येथील मुस्लिम बांधव, महिला, हिंदू बांधव उपस्थित होते. मसुरे पोलीस प्रमोद नाईक, विवेक फरांदे, होमगार्ड संजय मोरे यांनी वाहतूक नियोजन केले. कोरोनामुळे मगिलवर्षी साध्या पद्धतीने मोहरम साजरा करण्यात आला होता. निर्बंध नसल्याने यावर्षी मोठ्या प्रमाणात मुंबईकर मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. उत्सवाची सायंकाळी उशिरा झाली.

error: Content is protected !!