घसघशीत बक्षिस रकमांचे खास आकर्षण ; रंगतदार स्पर्धेची रसिकांना उत्सुकता..
आचरा | प्रतिनिधी : उद्या बुधवार १० ऑगस्ट रोजी शिवसेना आचरा विभागाच्या वतीने नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून सायंकाळी ५ वाजता आचरा तिठ्ठा सरकारी हॉस्पिटल नजिक नारळ लढवणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अत्यंत चुरशीच्या असणार्या या स्पर्धेकडे रसिकांचे डोळे लागले आहेत.
प्रथम पारितोषिक ४ हजार व चषक (विनायक परब पुरस्कृत), द्वितीय पारितोषिक २ हजार व चषक (राजन पांगे पुरस्कृत) अशी बक्षिसे घसघशीत रक्कम स्वरुपात असणे हे देखील या शिवसेना आचरा विभाग स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे.
ही स्पर्धा आचरा विभागातील अनुक्रमे आचरा, चिंदर, त्रिंबक, पळसंब, बांदिवडे, कोईल, वायंगणी, तळाशील ,तोंडवळी या गावांसाठीच मर्यादित स्पर्धा असणार आहे. प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या ४० स्पर्धकांना स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
स्पर्धकांनी त्यांची नावे नितीन घाडी 9420308518, साई साळकर 9404940451, लिलेश मांजरेकर 7021291282, हर्षद धुरी
9420805229, सागर परुळेकर 9420328844 यांच्याकडे नोंदवावी असे आवाहन आचरा शिवसेना शहर प्रमुख राजू नार्वेकर (9422585867) यांनी केले आहे.
तसेच विभागातील शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक यांनी उपस्थित राहावे असेही आवाहन शहर प्रमुख नार्वेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
ही माहिती आचरा शिवसेना विभाग प्रमुख समीर लबदे यांनी माध्यमांना दिली आहे.
स्पर्धेसाठी नियम व अटी खालील प्रमाणे आहेत.
1)स्पर्धा प्रवेश फी १००रु आहे. 2)प्रथम नांव नोंदणी करणाऱ्या ४० स्पर्धकांना सहभागी केले जाईल.
3)स्पर्धेसाठी नारळ आयोजक देणार आहेत.
4)आयोजकांचा निर्णय अंतिम राहणार आहे.
5) सहभागी स्पर्धकांना आयोजक तथा परीक्षकांशी कुठलीही हुज्जत घालता येणार नाही.
शिवसेना आचरा विभागातर्फे आयोजीत ही स्पर्धा रंगतदार परंतु खिलाडूवृत्तीने खेळली जाईल अशी खात्री आयोजक शिवसेना आचरा विभाग पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.