चिंदर | विवेक परब :
आचरा पिरावाडी येथील हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे शाळा येथे आज ऑगस्ट क्रांती दिन साजरा करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त सकाळी ११ वाजता राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मुलांची देश भक्ती पर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यात १ली ते६ वी मुलांनी उत्फूर्त पणे सहभाग घेतला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती, पालक, शाळा मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.