मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
देवगड तालुक्यातील हिंदळे ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरात ६६ दात्यांनी रक्तदान केले.
छत्रपती शिवाजी महाराज कृषी महाविद्यालयात किर्लोस ओरोस, उद्यान विद्या महाविद्यालय मुळदे, आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
माजी सभापती सुनील पारकर, हिंदळे सरपंच सौ.स्वरा पारकर, मिठबाव सरपंच भाई नरे, ग्रामपंचायत सदस्य शाम कदम,ग्रामसेवक मधुरा भुजबळ, ह्युमन राइट्स संघटना देवगड तालुका अध्यक्ष दया तेली, मनोज जाधव, निलेश कुंभार, डॉ. राठोड, सुरेश हिंडळेकर आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या एस.पी सामंत, प्राध्यापक एन. ए साईल, प्राध्यापक जी. डी. गायकी, प्राध्यापक व्ही. आर. गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले तसेच मुणगे गावातील कृषीदूत आयुष खरात, ओमकार लाड, अभयकुमार गायकवाड, शुभम कुमावत, आकाश बगाटे, सौरभ सुवारे, समाधान चोपडे इत्यादी उपस्थित होते
या कार्यक्रमासाठी रक्तपेढी व विघटन केंद्र जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गाचे रक्त संक्रमण अधिकारी,परिचारिका आणि कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.