मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून मिळालेल्या शैक्षणिक साहित्याचे वाटप माध्यमिक विद्यालय बिळवसच्या विद्यार्थ्यांना नुकतेच करण्यात आले. सदर शैक्षणिक साहित्याचे वाटप संस्था अध्यक्ष तथा माजी मुख्याध्यापक सूर्यकांत पालव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी संस्था सरचिटणीस श्री.अशोक जनार्दन पालव, मुख्या.जयवंत ठाकूर, सहा. शिक्षक रमेश नाईक,श्रीमती.राजवृदा परब, संतोष चव्हाण,श्रीमती. अनुष्का कदम, सतीश शिंदे, कुमारी.निकिता माळगांवकर, श्री.तुषार परब, श्री. चंद्रकांत कदम तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उप खजिनदार,कोकण महोत्सव श्री.संतोष हरिश्चंद्र परब (हुमरोस) यांच्या प्रयत्नामुळे
भारतीय जनता पार्टी, कल्याण (पू.)अध्यक्ष श्री.संजय बाबुराव मोरे यांच्या मार्फत २५ डझन वह्या व ५० कंपास पेट्या वाटप करण्यात आले.
त्याचप्रमाणे श्री.सीताराम आबा पालव (बिळवस, वरचा वाडा) यांनी त्यांचे जावई श्री.संतोष सुरेश राणे यांच्या मार्फत ३५ डझन वह्या प्राप्त करून दिलेल्या होत्या.
डॉ.धनश्री कोळंबकर यांच्या मार्फत त्यांची कन्या कुमारी सान्वी पालव हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आठ विद्यार्थ्यांना गणवेश व नऊ विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप करण्यात आले.त्याचबरोबर विद्यालयातील सर्व ६२ विद्यार्थ्यांना पेन, पेन्सिल व इतर शालोपयोगी वस्तूंच्या बॉक्सचे वाटप करण्यात आले.
श्री.सतीश अण्णासाहेब शिंदे सहाय्यक शिक्षक माध्यमिक विद्यालय बिळवस यांच्या प्रयत्नामुळे श्री.चैतन्य कांबळी- बिल्डर ऋतुराज अपार्टमेंट मालवण यांच्या मार्फत विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी १२ दप्तरे १० छत्र्या व ६ गणवेश देण्यात आले होते.
बिळवस ग्रामसेवा मंडळ मुंबई चे कार्याध्यक्ष श्री.दाजी विश्राम पालव यांची कन्या सौ.मंजिरी सि.राणे यांच्या माध्यमातून सद्गुरू श्री.वामनराव पै.लिखित “विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जीवनविद्येचे” या २४ पुस्तकांचा संच विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक बिळवस तर्फे चालविण्यात येणाऱ्या वाचनालया साठी देण्यात आलेला आहे.
दानशूर व्यक्तींचे बिळवस ग्रामसेवा मंडळ मुंबई व माध्यमिक विद्यालय बिळवस तर्फेबिळवस ग्रामसेवा मंडळ अध्यक्ष सूर्यकांत पालव यांनी आभार मानले आहेत.