शिरगाव / संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील शिरगाव येथील बँक ऑफ इंडिया च्या शाखेत पासबुक प्रिंटिंग मशीनमध्ये गेले वर्षभर वारंवार बिघाड होत असल्यामुळे ग्राहकांना आपले पासबुक वेळच्यावेळी प्रिंटिंग करून मिळत नसल्यामुळे आपल्या खात्यामध्ये किती रक्कम आहे ते कळत नाही. त्यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
कोरोना काळात बँकेत पासबुक प्रिंटिंग बंद होते.आणि सध्या प्रिंटिंग मशीनमध्ये बिघाड असल्यामुळे ग्राहकांना आपल्या खात्यामध्ये किती रक्कम शिल्लक आहे किव्हा एखादी रक्कम काढल्यानंतर किती शिल्लक आहे हेच कळत नाही.आपल्या खात्यामध्ये किती रक्कम शिल्लक आहे ते विचारावे लागते. तसेच ग्राहक स्वतःहून पासबुक प्रिंट करतात ती मशीन देखील सध्या नादुरुस्त अवस्थेत आहे.अशावेळी ग्राहकांना स्वतःच्या पासबुकवरील रक्कम किती आहे,किती जमा झाली,किव्हा काही रक्कम काढल्यावर बाकी किती आहे काही समजत नाही. तसेच या बँकेचे ए टी एम मशिनध्येही कधी कधी तांत्रिक बिघाड होत असतो.अशावेळी ग्राहकांनी काय करायचे?असा सवाल सध्या ग्राहकांकडून विचारला जात आहे.याबत बँकेत अधिक चौकशी केली असता अशी माहिती मिळाली की बँकेतील छोट्या पासबुक प्रिंटिंग मशीन मध्ये ओले पासबुक टाकले गेल्याने त्यात बिघाड झाला असून ती लवकरच दुरुस्त करण्यात येईल.तसेच पासबुक च्या मोठया प्रिंटिंग मशीनमध्ये देखील काही ग्राहकांनी स्टेपलर पिन असलेले पासबुक आता टाकल्याने त्या मशीनमधील बारकोड रीडर सेन्सर नादुरुस्त झाला आहे.मात्र तो मिळाला की ती मशीन देखील लवकरच सुरळीत होईल असे सांगण्यात आले.तसेच ग्राहकांनी आपलीच बँक आहे हे समजून आपले पासबुक प्रिंटिंग ला देताना ते पासबुक चांगल्या स्थितीत आहे का बघावे.आपल्या पासबुकची ग्राहकांनी आपणच स्वतः काळजी घ्यावी.जेणेकरून ही पासबुक प्रिंटिंग सेवा सुस्थितीत राहिल.
राष्ट्रीयकृत बँक म्हणून हीएकच बँक शिरगावमध्ये आहे.त्यामुळे दुसरी एखादी राष्ट्रीयकृत बँक शिरगावमध्ये व्हावी अशीही जोरदार मागणी ग्राहकांमधून होत आहे.