चिंदर | विवेक परब :
भारतीय संस्कृतीमध्ये सण, उत्सव व परंपरेला महत्त्वाचे स्थान आहे. देशभरात विविध भौगोलिक प्रदेशानुसार सर्वत्र सण, उत्सव व परंपरा साजरे केले जातात. भारतीय सण, उत्सव व परंपरेला पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने ही महत्व आहे. या माध्यमातून पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करणे हा ही संदेश दिला जातो. सणांच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण हा ही प्रमुख हेतू असतो. निसर्गाला किंवा पर्यावरणाला अनुसरूनच सर्व धर्माचे सण, उत्सव व परंपरा आहेत. सध्या गरज आहे सगळे सण हे निसर्गपूरक किंवा पर्यावरणपूरक कश्या पध्दतीने साजरे होतील हे पाहण्याची. त्यादृष्टीने जनजागृती होणे महत्वाचे आहे. कोकणात गणपती उत्सव मोठे धुमधडाका साजरा केला जातो त्याच बरोबर श्रावण महिन्यात नागपंचमीच्या सणालाही फार महत्त्व आहे त्यानिमित्त घराघरात मातीच्या नागोबाची पूजा केली जाते .

वराडकर स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा या प्रशालेतील कला विषय समिती मार्फत पर्यावरण पूरक मातीचे नागोबा बनवण्याचा उपक्रम घेण्यात आला या उपक्रमांतर्गत मुलांनी स्वतः साच्याचा वापर करून. स्थानिक भागात मिळणाऱ्या मातीपासून .आकर्षक नागोबा बनवण्यापासून ते रंग कामापर्यंत सर्व काम मुलांनी स्वतः केली.स्वनिर्मितीच्या आनंदा बरोबरच पर्यावरणाचे रक्षण आणि आपल्या समृद्ध परंपरेचा वारसा जपण्याचे मोलाचे कार्य या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांनी केलं या उपक्रमासाठी कलाशिक्षक श्री .समीर चांदरकर यांनी मार्गदर्शन केले तसेच प्रशालेचेे मुख्याध्यापक श्री संजय नाईक यांनी मुलांना प्रोत्साहन दिले. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाचे अध्यक्ष श्री अजयराज शरद वराडकर उपाध्यक्ष श्री.आनंद वराडकर, सचिव श्री.सुनील नाईक. श्रीमती.विजयश्री देसाई मॅडम, शालेय समिती अध्यक्ष श्री. सुधीर वराडकर व सर्व संचालक मंडळ यांनी शुभेच्छा दिल्या.