भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने आचरे गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन…!
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त हर घर तिरंगा फडकवण्यासाठी आचरा वासियांसाठी आचरा ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत तिरंगा देण्यात येणार असल्याचा निर्णय आचरा ग्रामसभेत घेण्यात आला. हर घर तिरंगा फडकवण्यासाठी प्रत्येक आचरा वासियांनी या सोहळ्यात योगदान देत सहकार्य करण्याचे आवाहन आचरा सरपंच प्रणया टेमकर यांनी यावेळी केले. या निमित्ताने आचरा गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन आचरा ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले आहे.
आचरा ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच प्रणया टेमकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी त्यांच्या सोबत माजी जिल्हा परिषद सदस्य जेरोन फर्नांडिस, उपसरपंच पांडुरंग वायंगणकर, जयप्रकाश परुळेकर, शाम घाडी, चंदन पांगे, यांसह ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर, ममता मिराशी, अनुष्का गांवकर,तसेच अन्य सदस्य , आरोग्य कर्मचारी, शिक्षक,अंगणवाडी सेविका, बचतगटाच्या महिला ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
यासभेत हर घर तिरंगा आणि स्वराज्य महोत्सवाबाबत नियोजन करण्यात आले. यानुसार सोमवार ८ऑगस्टला आचरा ग्रामपंचायत येथे दुपारी२.३०वाजता महिला सभा तर तीन वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे.मंगळवार ९ ऑगस्टला सर्व शाळा व अंगणवाडीतर्फे सकाळी १०.३०वाजता जागृती फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.बुधवार १० ऑगस्टला केंद्र शाळा आचरे नं१येथे सकाळी दहा वाजता इयत्ता तीसरी ते पाचवी च्या मुलांना निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा तर ६वी ते८वी च्या मुलांना वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ११ऑगस्टला वरचीवाडी अंगणवाडी येथे दुपारी बालगोपाळ पंगतीचे आयोजन करण्यात आले आहे.१२ऑगस्टला दुपारी २.३०वाजता आचरा वरचीवाडी येथील महिलांसाठी महिला मेळावा व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.१३ऑगस्टला आचरा हिर्लेवाडी येथे दुपारी तीन वाजता कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.१४ ऑगस्टला हुतात्मा स्मारक येथे सकाळी दहा वाजता वक्षारोपण व शालेय विद्यार्थी बचतगट महिला यांना वृक्षरोपांचे वाटप करण्यात येणार आहे. आचरे गावातील माजी सैनिकांचा सत्कार सोमवार १५ ऑगस्टला सकाळी दहा वाजता आचरा ग्रामपंचायत येथे करण्यात येणार आहे.१६ ऑगस्टला दुपारी तीन वाजता डॉ स्वरा भोगटे यांच्या सहकार्याने किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.तर १७ऑगस्टला दुपारी दोन वाजता आचरा ग्रामपंचायत येथे स्वराज्य महोत्सवानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण व महोत्सवाचा सांगता सोहळा होणार आहे.