शिरगांव | संतोष साळसकर :
देवगड येथील महाविद्यालयातील अर्थशास्त्र विषयाचे प्रमूख प्राचार्य शरद उत्तम शेट्ये यांनी सावित्रीबाई फुले पुणे पुणे विद्यापीठाची अर्थशास्त्र विषयातील पी.एच.डी.पदवी संपादन केली.प्राचार्य शेट्ये यांनी ‘ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमार सहकारी संस्थांचा आर्थिक अभ्यास ‘ या विषयावर पुणे विद्यापीठात प्रबंध साद केला होता.पुणे विद्यापीठाने हा प्रबंध स्विकारला असून प्राचार्य शेट्ये यांना डॉक्टरेट ही पदवी देण्यात आली आहे.
प्राचार्य शेट्ये यांना प्राचार्य डाॅ.एस.जी.शिंदे व प्राचार्य डॉ.एस.के.ढगे यांचे मार्गदर्शन लाभले.देवगड येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जनार्दन शेठ तेली,सभापती ॲड.अमित जामसंडेकर ,सर्व सदस्य, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डाॅ.सुखदा जांभळे,उपप्राचार्य सुरेश कुर्लीकर तसेच सर्व सहकारी मंडळीचे सहकार्य लाभले आहे.
प्राचार्य शेट्ये हे महाराष्ट्र राज्य अर्थशास्त्र विचार मंचचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरी बध्दल शासनाने राज्य पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.प्राचार्य शेट्य यांनी पी.एच.डी. पदवी संपादन केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.