शिरगांव |संतोष साळसकर :
माध्यमिक विद्यामंदिर कुणकेश्वर या प्रशालेचा ३३ वा वर्धापन दिन सोहळा प्रशाला सभागृहात संस्थाध्यक्ष राजेश वाळके यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे कुणकेश्वर येथील प्रसिद्ध आंबा बागायतदार अजय नाणेरकर, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी पं. स. राजापूर चे तुकाराम तेली, प्रसिद्ध आंबा बागायतदार व शेतकरी पुंडलिक नारकर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित उत्साहात संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर संस्थाउपाध्यक्ष निलेश पेडणेकर,संस्था सचिव प्रसाद कदम, सहसचिव भाऊ मुंबरकर, कोषाध्यक्ष संजय वाळके,संचालक अशोक वाळके, चंद्रशेखर बोंडाळे, श्रीकांत बोंडाळे,कुणकेश्वर सरपंच चंद्रकांत घाडी, उपसरपंच शशिकांत लबदे, कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट उपाध्यक्ष दिनेश धुवाली, सदस्य संजय आचरेकर, कुणकेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन मीना बोंडाळे,व्हॉईस चेअरमन सुहास नाणेरकर,जि.प पूर्ण प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका सौ पवार, केंद्रशाळा कुणकेश्वर मुख्याध्यापिका सौ. सनये, ग्रा. पं. सदस्य महेश ताम्हणकर, इळये- सडा येथील दीपक कदम, मारुती घाडी,माजी मुख्याध्यापक सुधाकर चव्हाण, माजी लेखनिक उदय पेडणेकर, माजी संस्था संचालक प्रमोद आंबेरकर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रमोद चव्हाण, प्रशालेचे मुख्याध्यापक माधव यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात प्रशालेच्या आवारात संस्थाध्यक्ष राजेश वाळके व संचालक,शिक्षक,विद्यार्थी,ग्रामस्थ यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. नंतर प्रशाला सभागृहात ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.प्रास्ताविक मुख्याध्यापक माधव यादव यांनी केले.
या प्रशालेच्या ३३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सन २०२१- २२ मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.यावेळी कुणकेश्वर पंचक्रोशीत विविध सेवेत कार्यरत असणारे ग्रामस्थ व शाळेला वेळोवेळी सहकार्य करणारे ग्रामस्थ यांचाही संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी अजय नाणेरकर यांनी आपले वडील कै.सुधाकर नाणेरकर यांच्या स्मरणार्थ प्रशालेस “फेस स्कॅनिंग अहेंडनस मशीन” भेट दिली.यावेळी या मशीन चे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.संस्थेचे सहकार्यवाह भाऊ मुंबरकर यांनी मुलांसाठी “पेन टॅब” भेट दिली.
याप्रसंगी संजीवनी हॉस्पिटल कणकवली चे शिक्षणप्रेमी डॉ. विद्याधर तायशेटे, कुणकेश्वर सरपंच चंद्रकांत घाडी, मुंबई येथील प्रवीण मांजरेकर यांच्या सौजन्याने प्रशालेतील मुलांना दैनंदिनी उपलब्ध करून देण्यात आल्या त्यांचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी(प.स.राजापूर) तुकाराम तेली, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रमोद चव्हाण, ज्येष्ठ संचालक अ. रा. वाळके, इळये मुख्याध्यापिका सौ.पवार, सोसायटी चेअरमन मीना बोंडाळे, संचालक श्रीकांत बोंडाळे, कु. दिव्या पेडणेकर यांनी आपली मनोगते मांडली.बाळासाहेब देरेकर यांनी आभार मानले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी,संचालक,ग्रामस्थ,पालक,शिक्षक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.