शिरगांव / संतोष साळसकर :
रोटरी क्लबच्यावतीने देवगड कॉलेज येथे सकाळी ८.३० वाजता श्री.स.ह.केळकर महाविद्यालयाच्या लायब्ररी हॉल येथे विद्यार्थांना हार्ट ॲटक आल्यानंतर हॉस्पिटलला दाखल करण्यापूर्वी रुग्णाचा जीव कशा पध्दतीने वाचविण्यासाठी काय करावं याचं प्रात्यक्षिक मास्टर ट्रेनर प्रविण सुलोकार यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत दिले.
या प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. सदर ट्रेनिंग रोटरी क्लब ऑफ मालवण, रोटरी क्लब ऑफ मॅंगोसीटी देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला डिस्ट्रीक्ट चेअरमन बेसिक लाईफ सपोर्टचे डॉक्टर रोटेरीअन अजित लिमये, मालवण यांनी रोटरी संदर्भातील संपुर्ण माहीती विषद करतानां सोशल ॲक्टीव्हीटीत सहभागी होण्यासाठी रोट्रॅक्टमध्ये सहभागी होण्याचे विद्यार्थीवर्गाला आवाहन केले.