24.6 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

कारगील विजय दिनानिमीत्त भाजपा वेंगुर्लेच्या वतीने माजी सैनिक नायब सुभेदार संतोष सुरेश चेंदवणकर यांचा सत्कार.

- Advertisement -
- Advertisement -

चिंदर / एडिटोरिअल असिस्टंट :
देशाच्या शुर सैनिकांच्या शौर्याचे, पराक्रमाचे आणि बलिदानाच प्रतीक म्हणून कारगील विजय दिवस साजरा केला जातो. कारगील विजय दिवस स्वतंत्र भारताच्या प्रत्येक देशवासियांसाठी महत्वपूर्ण आहे. याच दिवशी भारत आणि पाकिस्तान मध्ये १९९० मध्ये कारगील युद्ध झाले व जवळ जवळ ६० दिवस हे युद्ध सुरु होते आणि २६ जुलै रोजी हे युद्ध भारताने जिंकले, त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणुनच या दिवशी शहीद वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांना अभिवादन केले जाते.
भाजपा वेंगुर्ले च्या वतीने दरवर्षी कारगील विजय दिनानिमीत्त माजी सैनिकांना त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात येतो व त्यांच्या देशसेवेचा गौरव करण्यात येतो.
ह्या वर्षी सुध्दा भाजपा चे जेष्ठ कार्यकर्ते अरुण ठाकुर यांच्या हस्ते नायब सुभेदार संतोष सुरेश चेंदवणकर यांचा परबवाडा येथील निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांसह सत्कार करण्यात आला. संतोष चेंदवणकर हे १९९४ साली सैन्यात दाखल झाले, त्यांनी राजस्थान, जम्मू काश्मीर व पंजाब याठिकाणी २५ वर्षे देशसेवा केली. तसेच दिनांक २८ फेब्रुवारी २०१९ रोजी नायब सुभेदार या पदावरुन सेवानिवृत्त झाले. त्यांनी संपूर्ण सेवाकाल आर्मड कोअर मध्ये घालवला. यावेळी त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर, महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस सारिका काळसेकर, परबवाडा सरपंच विष्णू उर्फ पपु परब, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर, ता.चिटणीस समीरभाई चिंदरकर, अल्पसंख्याक सेलचे सायमन फर्नांडिस, रविंद्र शिरसाठ, ग्रामपंचायत सदस्य संतोष सावंत व कृतीका साटेलकर, बुथप्रमुख पुंडलिक हळदणकर, रुपेश ठाकुर इत्यादी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

चिंदर / एडिटोरिअल असिस्टंट :
देशाच्या शुर सैनिकांच्या शौर्याचे, पराक्रमाचे आणि बलिदानाच प्रतीक म्हणून कारगील विजय दिवस साजरा केला जातो. कारगील विजय दिवस स्वतंत्र भारताच्या प्रत्येक देशवासियांसाठी महत्वपूर्ण आहे. याच दिवशी भारत आणि पाकिस्तान मध्ये १९९० मध्ये कारगील युद्ध झाले व जवळ जवळ ६० दिवस हे युद्ध सुरु होते आणि २६ जुलै रोजी हे युद्ध भारताने जिंकले, त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणुनच या दिवशी शहीद वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांना अभिवादन केले जाते.
भाजपा वेंगुर्ले च्या वतीने दरवर्षी कारगील विजय दिनानिमीत्त माजी सैनिकांना त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात येतो व त्यांच्या देशसेवेचा गौरव करण्यात येतो.
ह्या वर्षी सुध्दा भाजपा चे जेष्ठ कार्यकर्ते अरुण ठाकुर यांच्या हस्ते नायब सुभेदार संतोष सुरेश चेंदवणकर यांचा परबवाडा येथील निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांसह सत्कार करण्यात आला. संतोष चेंदवणकर हे १९९४ साली सैन्यात दाखल झाले, त्यांनी राजस्थान, जम्मू काश्मीर व पंजाब याठिकाणी २५ वर्षे देशसेवा केली. तसेच दिनांक २८ फेब्रुवारी २०१९ रोजी नायब सुभेदार या पदावरुन सेवानिवृत्त झाले. त्यांनी संपूर्ण सेवाकाल आर्मड कोअर मध्ये घालवला. यावेळी त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर, महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस सारिका काळसेकर, परबवाडा सरपंच विष्णू उर्फ पपु परब, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर, ता.चिटणीस समीरभाई चिंदरकर, अल्पसंख्याक सेलचे सायमन फर्नांडिस, रविंद्र शिरसाठ, ग्रामपंचायत सदस्य संतोष सावंत व कृतीका साटेलकर, बुथप्रमुख पुंडलिक हळदणकर, रुपेश ठाकुर इत्यादी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!