तहसील कार्यालयातील जनरेटर बंद ; लाईट नसल्यामुळे तहसील कार्यालय सहित इतर कार्यालयातील कामे ठप्प…!
वैभववाडी | नवलराज काळे : तालुक्यातील केंद्रबिंदू असणाऱ्या तहसील कार्यालया त सकाळपासून जनतेला मनस्ताप सहन करावा लागत आहे. तालुक्यातील सकाळपासून बत्ती गुल झाले असल्यामुळे व तहसील कार्यालयातील जनरेटर बंद असल्यामुळे जनतेची कामे खोळंबली आहेत.
सेतू कार्यालय आधार केंद्र अशा अनेक विभागातील कामकाज हे विजेवर चालत असतं परंतु सकाळपासून वीजच नसल्यामुळे आणि तहसील कार्यालयातील जनरेटर बंद असल्यामुळे ही कामे होऊ शकत नाहीत. या सर्व प्रकाराचा तालुक्यातील जनतेला लांब दुरून दरी खोऱ्यातून आपली कामे घेऊन तहसील कार्यालयात येणाऱ्या लाभार्थ्यांना लाईट व जनरेटर ची सोय नसल्यामुळे निराश होऊन मागे परतावं लागत आहे. नक्की याला जबाबदार कोण…? तहसील कार्यालयात जनरेटर असून देखील तो अजून चालू का नाही…? असे अनेक प्रश्न जनतेला पडले आहेत. जनरेटर सुविधा चालू झाली असता या अडचणींवर ती मात होऊ शकते संबंधित प्रशासनाने तिकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा आपली सिंधू नगरी चॅनेल कडून वैभववाडी तालुका प्रतिनिधी नवलराज काळे यांनी केली आहे. तालुक्यात वारंवार लाईटचा प्रॉब्लेम होत असल्यामुळे तालुक्यातील व्यवसायिक मोठ्या प्रमाणात चिंतेत आहेत.