मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
गेले दोन दिवस होत असलेल्या जोरदार पर्जन्यवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे बांदिवडे पालयेवाडी येथील प्रशांत विष्णू परब यांच्या रिक्षा वर आंब्याचे झाड मोडून पडल्याने सुमारे ४८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
शनिवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडली. घराबाहेर जोरदार आवाज झाल्याने बाहेर येऊन पाहिले असता रिक्षा शेड लगतचे आंब्याचे झाड मोडून रिक्षा वर पडल्याचे दिसून आले. सकाळी बांदिवडे ग्रामस्थांनी सदर झाड तोडून बाजूला केले. तलाठी संतोष जाधव यांनी नुकसानीचा पंचनामा केला. सरपंच सौ प्रविणा परब, माजी जि प सदस्य जेरॉन फर्नांडिस, सोसायटी अध्यक्ष प्रफ्फुल प्रभू,
उपसरपंच किरण पवार , पोलीस पाटील नरेश मसुरकर, कोतवाल सचिन चव्हाण, विश्वनाथ परब, महेश हडकर, विनायक गावकर,संजय जोशी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.