मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपीड यांच्या वतीने दहीबाव दळवीवाडी येथील गरजू महिला सौ. पूजा हेमंत दळवी यांना उदरनिर्वाहासाठी मठाच्या वतीने शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. तसेच त्यांचा मुलगा साहिल हेमंत दळवी याला संस्थेच्या वतीने शिक्षणासाठी दत्तक घेऊन त्याच्या शिक्षणाचा खर्च श्री स्वामी समर्थ मठाच्या वतीने केला जाणार असल्याचे मठाचे संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर व अध्यक्ष प्रभाकर राणे यांनी सांगितले. गुरुपौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हडपीड येथील स्वामी समर्थ मठाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम नियमित राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून सदर महिलेस शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर यांनी दिली. यावेळी अध्यक्ष प्रभाकर राणे, सचिव नंदकुमार पेडणेकर, श्री मधुसूदन भडसावळे,
श्री दीपक बाबू आईर तसेच श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालीत श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड विश्वस्त आणि श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई व श्री स्वामी समर्थ मठ हडपीड गाव समिती सर्व पदाधिकारी उपस्थित होते. गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त मठामध्ये फुलांची आकर्षक सजावट नंदकुमार पेडणेकर व स्वामी भक्त यांनी केली होती.