ओरोस | प्रतिनिधी : जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडील विविध योजनांमध्ये चांगले काम करणाऱ्या क्षेत्रीय कृषी अधिकारी आणि कर्मचारी यांना कुडाळ येथील राणभाजी महोत्सवात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सन २०२०-२१ या वर्षात मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड, विविध चर्चासत्र, कृषी मेळावे, विकेल ते पिकेल, योजनेअंतर्गत शेतकरी ते ग्राहक थेट शेतीमाल विक्री केंद्र उभारणी, कोरोना काळात शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, कृषी संजीवनी मोहीम, रोहिणी नक्षत्र पंधरवडा, मागेल त्याला शेततळे, शेतीशाळा आदी योजना राबविण्यात आल्या.