खासदार सुरेश प्रभू यांच्या वाढदिवासाचे औचित्य.
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : मानव साधन विकास संस्था संचलित अध्यक्षा उमा प्रभू, जन शिक्षण संस्थान-सिंधुदुर्ग परिवर्तन केंद्र अंतर्गत माजी खासदार सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नातून गोवा विमानतळ प्राधिकरण-CSR निधितून महिला सक्षमी करणासाठी शिलाई मशीन समन्वयक संस्था आचरा यांच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज आचरा येथे दहा लाभार्थी महिलांना परिवर्तन केंद्र समन्वयक श्री. विलास हडकर यांच्या हस्ते शिलाई मशिनचे वितरण करण्यात आले. यावेळी हडकर यांनी स्रियांना आर्थिक उन्नतीसाठी व्यावसायिकही मार्गदर्शन केले. शिलाई मशिन लाभार्थ्यांन पर्यंत पोचवण्यासाठी समिर बांवकर यांनी विशेष प्रयत्न केले.
यावेळी चंद्रकला भोसले, वैदेही विनोद गोसावी, तन्वी रुपेश हडकर, संजना गांवकर, कविता घाडी, कांचन करंजे,समिक्षा कांबळी, वैदेही मुणगेकर, रुपेश हडकर, मानसी खडपे, लवू घाडी, कमलाकर करंजे, विनोद गोसावी इ. उपस्थित होते.