अध्यक्षपदी डॉ. प्रशांत कोलते : सेक्रेटरीपदी उदय जांभवडेकर, खजिनदारपदी नवीन बांदेकर
ओरोस | प्रतिनिधी : नव्याने स्थापन झालेल्या रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलचा पदाग्रहन सोहळा ओरोस येथील शरद कृषी भवन येथे झाला. सन २०२१-२२ नवीन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी डॉ. प्रशांत कोलते, सेक्रेटरी उदय जांभवडेकर, तर खजिनदारपदी नवीन बांदेकर यांची नियुक्ती करण्यात आली.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी समाजासाठी उचित काम करावे, असे प्रतिपादन रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नॉमिनी नासीर बोरसादवालायांनी यावेळी केले. त्यांच्यासमवेत असिस्टंट गव्हर्नर शशिकांत चव्हाण, राजेश घाटवळ, क्लबचे जी एस आर गजानन कांदळगावकर,ओरोस सरपंच प्रीती देसाई, जिल्ह्यातील रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.