26 C
Mālvan
Monday, December 23, 2024
IMG-20240531-WA0007

जन आशीर्वाद यात्रा रोखण्यासाठीच राणेंवर कारवाई : राजन तेली

- Advertisement -
- Advertisement -

यात्रा कोणत्याही परिस्थितीत होणारच…

कणकवली / उमेश परब – राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर राज्य सरकार बिथरले. त्यामुळेच राणेंवर अटकेची कारवाई केली, असा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष तेली यांनी आज केला. तसेच जन आशीर्वाद यात्रा कोणत्याही परिस्थितीत होणारच असेही ते म्हणाले.
तेली म्हणाले, राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेसाठी जिल्ह्यात दिवाळी-दसरा सणासारखे उत्साही वातावरण झाले होते. केंद्रीय उद्योगमंत्री राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेचे स्वागत करण्यासाठी सिंधुदुर्गातील भाजपा कार्यकर्ते आणि जनता प्रचंड उत्साही आहे. तांत्रिक अडचणीमुळे यात्रा पुढे ढकलण्यात आली असून दोन दिवसांत यात्रेचे रिशेड्युल कळविण्यात येईल.
परिवहन मंत्री अनिल परब यांचा राणेंच्या अटकेबाबत पोलिसांवर दबाव टाकतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावरून राणेंना झालेली अटक ही सूडबुद्धीने केल्याचे सिद्ध होत असल्याचा आरोपही तेली यांनी केला. पालकमंत्री उदय सामंत हे जिल्हावासीयांची फसवणूक करत आहेत. सत्ताधारी केवळ विकास प्रकल्पाची घोषणा करतात. पण पूर्तता करत नाहीत. सी वर्ल्ड, आडाळी एमआयडीसी, नाणार प्रकल्पाला विरोध केला. केंद्रीय उद्योगमंत्री राणेंच्या माध्यमातून कोकणचा विकास होणार, हे स्पष्ट आहे. राणेंना केलेल्या अटकेची किंमत राज्य सरकारला कोकणी जनता मोजायला लावेल, असा इशाराही तेली यांनी दिला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

यात्रा कोणत्याही परिस्थितीत होणारच…

कणकवली / उमेश परब - राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर राज्य सरकार बिथरले. त्यामुळेच राणेंवर अटकेची कारवाई केली, असा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष तेली यांनी आज केला. तसेच जन आशीर्वाद यात्रा कोणत्याही परिस्थितीत होणारच असेही ते म्हणाले.
तेली म्हणाले, राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेसाठी जिल्ह्यात दिवाळी-दसरा सणासारखे उत्साही वातावरण झाले होते. केंद्रीय उद्योगमंत्री राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेचे स्वागत करण्यासाठी सिंधुदुर्गातील भाजपा कार्यकर्ते आणि जनता प्रचंड उत्साही आहे. तांत्रिक अडचणीमुळे यात्रा पुढे ढकलण्यात आली असून दोन दिवसांत यात्रेचे रिशेड्युल कळविण्यात येईल.
परिवहन मंत्री अनिल परब यांचा राणेंच्या अटकेबाबत पोलिसांवर दबाव टाकतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावरून राणेंना झालेली अटक ही सूडबुद्धीने केल्याचे सिद्ध होत असल्याचा आरोपही तेली यांनी केला. पालकमंत्री उदय सामंत हे जिल्हावासीयांची फसवणूक करत आहेत. सत्ताधारी केवळ विकास प्रकल्पाची घोषणा करतात. पण पूर्तता करत नाहीत. सी वर्ल्ड, आडाळी एमआयडीसी, नाणार प्रकल्पाला विरोध केला. केंद्रीय उद्योगमंत्री राणेंच्या माध्यमातून कोकणचा विकास होणार, हे स्पष्ट आहे. राणेंना केलेल्या अटकेची किंमत राज्य सरकारला कोकणी जनता मोजायला लावेल, असा इशाराही तेली यांनी दिला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री उपस्थित होते.

error: Content is protected !!