आचरा ग्रामपंचायत सदस्य सौ. अनुष्का गांवकर यांचा पुढाकार..
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा पिरावाडी येथील यश सुनिल बांदेकर या पितृछत्र हरपलेला एक विद्यार्थी आचरा हायस्कूल मध्ये आठवीत शिकत आहे. वयोवृद्ध आजी आजोबा त्याचा सांभाळ करत आहेत. उत्पन्नाचे साधन नसताना नातेवाईकांच्या तुटपुंज्या मदतीवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. कु. यश याचे वडिल काही दिवसां पूर्वी जग सोडून गेले याचा धक्का तो सहन करु शकत नव्हता. बुध्दीवान असलेल्या यशने स्पर्धा परिक्षा शालांत परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केलेले आहे. यशचे हरवलेले पितृछत्र व त्याची व्यथा आचरा ग्रामपंचायत सदस्या सौ. अनुष्का गांवकर यांनी शिवसेना महिला समन्वयक (मालवण) पूनम चव्हाण यांच्या कानावर घातली. पूनम चव्हाण यांनी लगेचच आपल्या टोपीवाला हायस्कूल कला शाखा 2005 च्या बॅच समुहाला याची कल्पना दिली. त्यानंतर त्यांनी आचरा येथील बांदेकर यांच्या घरी जावून त्याच्या आजी आजोबां बरोबर चर्चा केली. त्यांना समुहाच्या वतीने आर्थिक मदत दिली तसेच शासनाच्या वतीने येणारी कोणती योजना असेल तर पाठपूरावा करु असे आश्वासनही चव्हाण यांनी दिले.
यावेळी आचरा ग्रामपंचायत सदस्या सौ. अनुष्का गांवकर, शिवसेना महिला तालुका समन्वयक पूनम चव्हाण, सोनल चव्हाण, ऋतुजा मांजरेकर, स्वप्निल जंगले, अंंकुश आरोलकर, भक्ती वालावलकर, प्रथमेश वायंगणकर, शिल्पा चव्हाण, हर्षदा माणगांवकर, विवेक जाधव, मोरेश्वर खोबरेकर, पंकज सामंत, पंकज मेस्री, नागेश चव्हाण, बचत गट सि, आर, पी सेजल आचरेकर इत्यादी उपस्थित होते.