बळीराजासाठी एक दिवस उपक्रम…!
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : चिंदर भटवाडी शाळेतील उपक्रम बळीराजासाठी एक दिवस या जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आयोजित उपक्रमांतर्गत प्रत्यक्ष बांधावर जाऊन मुलांना शेतीचे धडे दिले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अजूनही मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय केली जातो. मात्र समाजात शेतीबद्दलची आवड कमी होत चालली आहे असे दिसून येते. शेतकरी हा जगाचा अन्नदाता, पोशिंदा आहे तोच जर टिकला नाही तर माणसाचं पोट कसं भरणार.
शालेय वयातच मुलांना शेतीची आवड निर्माण व्हावी, शेतीविषयी माहिती मिळावी जेणेकरून शेतकऱ्यांविषयी आदर निर्माण होईल म्हणून चिंदर भटवाडी शाळेने बळीराजांसाठी एक दिवस या उपक्रमांतर्गत श्री सुनील अंकुश धुमडे यांच्या बांधावर बळीराजासाठी एक दिवस हा उपक्रम घेतला.
त्यावेळी मुलांनी प्रत्यक्ष तरवा काढणे, चिखल करणे, लावणी लावणे अशा कामांचा अनुभव घेतला. श्री.धुमडे व श्री कदम यांनी आधुनिक शेती व पूर्वीची शेती यांतील फरक व शेतीची अवजारे इत्यादी बदली माहिती दिली, तसेच त्यांच्या घराशेजारी असणाऱ्या विविध झाडांबद्दल माहिती दिली. यावेळी मुख्याध्यापक श्री रतन बुटे, सहशिक्षिका श्रीम. निशिगंधा वझे, पालक श्रीमती मनीषा नाटेकर, महेश कदम, साक्षी धुमडे इत्यादी उपस्थित होते श्री सुनील धुमडे यांनी मुलांना कांदा भाकर व उसळ अशी न्याहारी दिली. दरवर्षी असा उपक्रम करावा असे सांगितले.