आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश..!!
नेरूर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी मानले आमदार वैभव नाईक यांचे जाहिर आभार..!!
कुडाळ । देवेंद्र गावडे
शुक्रवार । ८ जुलै, २०२२
एम्.आय.डी.सी. कुडाळ येथील औद्योगिक प्रकल्प अस्तित्वात येत असतानाच इथल्या भुमिपुत्रांनी केलेल्या त्यागाची यादी फार मोठी आहे.
स्वतःच्या उपजाऊ शेतजमिनी आपल्या भावी पिढ्यांच्या भवितव्यासाठी इथल्या ग्रामस्थांनी औद्योगिक प्रकल्प उभे राहण्यासाठी उपलब्ध कर्न दिल्या.
एम्.आय्.डी.सी. लगतच्या परीसरामध्ये प्रकल्पग्रस्तांचा पाणी प्रश्न अलिकडे फार जटिल झाला होता.
गेले कित्येक दिवस एम्.आय.डी.सी. कार्यालयाकडे सदर भागातील प्रकल्पग्रस्तांना पाणीपुरवठा व्हावा यासाठी नेरूर ग्रामपंचायतीच्यावतीने पाठपुरावा करण्यात येत होता.
यासाठी कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांना सदर प्रश्नामध्ये लक्ष घालण्याची विनंती नेरूर ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आली आणि सदर पाणीप्रश्न यशस्विरित्या निकाली निघाला.
एम्.आय.डी.सी. कुडाळच्यावतीने नेरूर गणेशवाडी-वाघचौडी प्रकल्पग्रस्तांना आता रितसर पाणीपुरवठा करण्यात येईल.
शिवाय वाढीव कोट्यामधून नेरूर-गोंधयाळे येथील प्रकल्पग्रस्तांना पाणी पुरवठा करण्याच्या मागणीला देखील मंजूरी मिळालेली आहे.
यापूर्वी एम्.आय्.डी.सी.कडील नेरूर गणेशवाडी येथील स्मशानभूमी व एम्.आय्.डी.सी मधून नेरूर गोंधयाळेच्या दिशेने जाणारा रस्ता ही महत्वपूर्ण कामे देखील पूर्णत्वास गेलेली आहेत.
या विविध व महत्वपूर्ण मागण्या मान्य करून घेऊन त्यासाठी विशेष पाठपुरावा केल्याबद्धल आमदार वैभव नाईक यांचे नेरूर सरपंच शेखर गावडे, उपसरपंच समद मुजावर, ग्रा.प. सदस्य राजन पावसकर, ग्रा.प. सदस्य प्रसाद गावडे, ग्रा.प. सदस्या सौ. माधवी गावडे, इतर सर्व ग्रामपंचाय सदस्य व नेरूरवासियांच्यावतीने जाहिर आभार व्यक्त करण्यात आले.