विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
मुलांना शैक्षणिक सुविधा मिळण्यासाठी अनेक दाते आर्थिक मदत करत आहेत. त्यांचे ऋण पैशातून नव्हे तर उज्वल यशातून फेडण्याचे आवाहन आचरा हायस्कूलच्या स्थानिक स्कूल समिती अध्यक्षा व माजी सभापती निलिमा सावंत यांनी आचरा येथे केले.
न्यू इंग्लिश स्कूल आचराच्या इयत्ता पाचवीमध्ये प्रवेश घेतलेल्या चाळीस विद्यार्थ्यांना शाळा समिती तर्फे गणवेश तर प्रशालेच्या शिक्षक वर्गाकडून वह्यांचे मोफत वितरण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी त्यांच्या सोबत स्थानिक स्कूल समितीचे बाबाजी भिसळे, अर्जुन बापर्डेकर, रघुनाथ पाटील, राजन पांगे, शंकर मिराशी, मुख्याध्यापक गोपाळ परब, उपमुख्याध्यापक घुटूकडे, तसेच इतर शिक्षक, कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी इयत्ता पाचवीच्या मुलांकडून मदत देणार्या शाळा समितीचे व शिक्षकांचे धन्यवाद व्यक्त केले गेले.