23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

जि.प.आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वेतनवाढ देण्याचे राज्यशासनाचे निर्देश…!

- Advertisement -
- Advertisement -

दीड हजार शिक्षकांना मिळणार लाभ…!

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
राज्यात २०१८ पूर्वीच्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना जादा वेतनवाढ देण्याचे निर्देश राज्याच्या ग्राम विकास विभागाने सर्व जिल्हापरिषदांना दिल्या आहेत.राज्यातील १५०० पेक्षा अधिक शिक्षकांना याचा लाभ मिळणार आहे.
राज्यातील जिल्हापरिषद स्तरावरुन आदर्श शिक्षकांची निवड केली जाते.या शिक्षकांना सन २००० पूर्वी कुठल्याही प्रकारची वेतनवाढ दिली जात नव्हती. मात्र २००० पासून एक जादा वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात १२ डिसेंबर २००० रोजी एकत्रीत मार्गदर्शक निर्देशही दिले होते.त्यानुसार पुरस्कार प्राप्त शिक्षकांना जादा वेतनवाढ देऊन त्यावर होणारा खर्च जिल्हापरिषदेने स्वनिधीतून खर्च करण्याचे स्पष्ट केले होते.मात्र त्यानंतर सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीत शासनाने जादा वेतनवाढच देण्याची योजनाच बंद केली.त्यामुळे जि.प.पुरस्कार प्राप्त शिक्षकांमधुन असंतोष निर्माण झाला होता. सिंधुदुर्ग मधुन सिंधुदुर्ग शिक्षक लढा मंच तर्फे श्री.शिवराज सावंत यांच्या नेतृत्वाखाली ५६ शिक्षकांनी अँड.मुरगे,अँड.भागोजी यांच्या मार्फत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती,सिंधुदुर्ग मधुन या लढ्यात श्री.शिवराज सावंत ,श्री.उदय गोसावी,श्री.विजय भोगले,श्री.शामसुंदर सावंत,श्री.महेश गावडे,श्री.प्रदीप मांजरेकर,श्री.महेश पालव,श्री.शशांक आटक,श्री.आनंद जाधव,श्री.भीवा सावंत,श्री.श्रीकृष्ण बागवे,श्री.प्रशांत पारकर,श्री.संतोष राणे,श्री.धर्मराज धुरत,श्रीम.इंदु डगरे,श्री.सुभाष नाटेकर,श्री.दत्तगुरु कांबळी,श्री.कृष्णा सावंत,श्री.जगदिश गोगटे,श्री.दिगंबर तळणकर,श्री.विनोद कदम,श्री.आप्पा साहेब हरमलकर,श्री.रावजी परब,श्री.झिलु घाडी,स्व.भास्कर सावंत,दिवंगत संजय कदम, श्री.जयदेव सारंग,व एकुण ५६ शिक्षकांनी याकामी सहकार्य केले होते.
सिंधुदुर्ग व राज्यातील इतर जिल्ह्यातील या सर्व याचिकांचा निर्णय सकारात्मक लागला.त्यानुसार राज्याच्या ग्रामविकास विभागाने ही मंजुरी दिली आहे.त्यामुळे वेतनवाढीचा प्रश्न सुटला आहे.अशी माहिती सिंधुदुर्ग शिक्षक लढा मंच तर्फे देण्यात आली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

दीड हजार शिक्षकांना मिळणार लाभ...!

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
राज्यात २०१८ पूर्वीच्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना जादा वेतनवाढ देण्याचे निर्देश राज्याच्या ग्राम विकास विभागाने सर्व जिल्हापरिषदांना दिल्या आहेत.राज्यातील १५०० पेक्षा अधिक शिक्षकांना याचा लाभ मिळणार आहे.
राज्यातील जिल्हापरिषद स्तरावरुन आदर्श शिक्षकांची निवड केली जाते.या शिक्षकांना सन २००० पूर्वी कुठल्याही प्रकारची वेतनवाढ दिली जात नव्हती. मात्र २००० पासून एक जादा वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात १२ डिसेंबर २००० रोजी एकत्रीत मार्गदर्शक निर्देशही दिले होते.त्यानुसार पुरस्कार प्राप्त शिक्षकांना जादा वेतनवाढ देऊन त्यावर होणारा खर्च जिल्हापरिषदेने स्वनिधीतून खर्च करण्याचे स्पष्ट केले होते.मात्र त्यानंतर सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीत शासनाने जादा वेतनवाढच देण्याची योजनाच बंद केली.त्यामुळे जि.प.पुरस्कार प्राप्त शिक्षकांमधुन असंतोष निर्माण झाला होता. सिंधुदुर्ग मधुन सिंधुदुर्ग शिक्षक लढा मंच तर्फे श्री.शिवराज सावंत यांच्या नेतृत्वाखाली ५६ शिक्षकांनी अँड.मुरगे,अँड.भागोजी यांच्या मार्फत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती,सिंधुदुर्ग मधुन या लढ्यात श्री.शिवराज सावंत ,श्री.उदय गोसावी,श्री.विजय भोगले,श्री.शामसुंदर सावंत,श्री.महेश गावडे,श्री.प्रदीप मांजरेकर,श्री.महेश पालव,श्री.शशांक आटक,श्री.आनंद जाधव,श्री.भीवा सावंत,श्री.श्रीकृष्ण बागवे,श्री.प्रशांत पारकर,श्री.संतोष राणे,श्री.धर्मराज धुरत,श्रीम.इंदु डगरे,श्री.सुभाष नाटेकर,श्री.दत्तगुरु कांबळी,श्री.कृष्णा सावंत,श्री.जगदिश गोगटे,श्री.दिगंबर तळणकर,श्री.विनोद कदम,श्री.आप्पा साहेब हरमलकर,श्री.रावजी परब,श्री.झिलु घाडी,स्व.भास्कर सावंत,दिवंगत संजय कदम, श्री.जयदेव सारंग,व एकुण ५६ शिक्षकांनी याकामी सहकार्य केले होते.
सिंधुदुर्ग व राज्यातील इतर जिल्ह्यातील या सर्व याचिकांचा निर्णय सकारात्मक लागला.त्यानुसार राज्याच्या ग्रामविकास विभागाने ही मंजुरी दिली आहे.त्यामुळे वेतनवाढीचा प्रश्न सुटला आहे.अशी माहिती सिंधुदुर्ग शिक्षक लढा मंच तर्फे देण्यात आली आहे.

error: Content is protected !!