23 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

हिंदळे येथे कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्राचे मोदी गुरुजींच्या हस्ते उद्घाटन…!

- Advertisement -
- Advertisement -

शिरगाव | संतोष साळसकर :
देवगड तालुक्यातील हिंदळे गावातील ग्रामपंचायत सभागृह येथे उद्यानविद्या महाविद्यालय , मुळदे च्या चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत १ जुलै रोजी ” महाराष्ट्र कृषी दिनाचे ” औचित्य साधून ” कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र ” उभारले आहे . या माहिती केंद्राचे उद्‌घाटन हिंदळे – पोयरे सहकारी संस्थेचे संचालक मनोहर मोदी गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले . या कृषी माहिती केंद्राचा उद्देश शेतकऱ्यांच्या विविध प्रकारच्या समस्या सोडविणे तसेच विद्यापीठाने विकसित केलेले नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे . यावेळी मान्यवरांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कृषी माहिती केंद्राच्या उद्‌घाटना प्रसंगी हिंदळे गावच्या सरपंच सौ. पारकर , ग्रामसेवक , तलाठी व गावातील सर्व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन उद्यानविद्या महाविद्यालय , मुळदेचे विद्यार्थी निखिल धाक ,ओम कदम , सुयश राऊळ , ऋतिक कोंडूरकर , श्रेयस साळवी व श्रेयश सावंत यांनी केले होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

शिरगाव | संतोष साळसकर :
देवगड तालुक्यातील हिंदळे गावातील ग्रामपंचायत सभागृह येथे उद्यानविद्या महाविद्यालय , मुळदे च्या चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत १ जुलै रोजी " महाराष्ट्र कृषी दिनाचे " औचित्य साधून " कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र " उभारले आहे . या माहिती केंद्राचे उद्‌घाटन हिंदळे - पोयरे सहकारी संस्थेचे संचालक मनोहर मोदी गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले . या कृषी माहिती केंद्राचा उद्देश शेतकऱ्यांच्या विविध प्रकारच्या समस्या सोडविणे तसेच विद्यापीठाने विकसित केलेले नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे . यावेळी मान्यवरांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कृषी माहिती केंद्राच्या उद्‌घाटना प्रसंगी हिंदळे गावच्या सरपंच सौ. पारकर , ग्रामसेवक , तलाठी व गावातील सर्व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन उद्यानविद्या महाविद्यालय , मुळदेचे विद्यार्थी निखिल धाक ,ओम कदम , सुयश राऊळ , ऋतिक कोंडूरकर , श्रेयस साळवी व श्रेयश सावंत यांनी केले होते.

error: Content is protected !!