मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
सर्वांचे आशीर्वाद आणि वरिष्ठांचे वेळोवेळचे मार्गदर्शन आणि कुटुंबियायांचे पाठबळ यामुळे शासकीय सेवेतील कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करू शकले असे प्रतिपादन प्राथमिक आरोग्य केंद्र, पणदुरच्या आरोग्य सहाय्यिका सौ. विशाखा विश्वनाथ गोसावी यांनी पणदूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे केले. त्या नियत वयोमानानुसार नुकत्याच सेवा निवृत्त झाल्या.
प्राथमिक आरोग्य केंद्र पणदुर या ठिकाणी डाॅ. चिवडे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी डॉ चिवडे म्हणाले, विशाखा गोसावी या उत्कृष्ट प्रशासक, उत्कृष्ट काम करण्याची पद्धत, सहका-यांना मार्गदर्शन करणे, रेकॉर्ड टापटीप आणि व्यवस्थित ठेवणे, शासकीय प्रसंगातून योग्य मार्ग काढणे यासाठी श्रीम. विशाखा गोसावी या अनुभवी कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या. जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी पतसंस्था येथे गेली दहा वर्षे संचालक म्हणून कार्यरत आहेत. कामाचा उत्कृष्ट नमुना म्हणून श्रीम विशाखा गोसावी यांचे जवळ पाहिले जाते. असे मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. सेवा काळात प्राथमिक आरोग्य केंद्र कडावल अधिनस्त पांग्रड, भुईबावडा-उंबर्डे, प्राथमिक आरोग्य केंद्र अधिनस्त परुळे अधिनस्त म्हापण, हिर्लोक,मसुरे, पणदुर याठिकाणी त्यांनी सेवा बजावली.
यावेळी डॉ. काजरेकर, डॉ. खोत,श्रीम कुंदा पवार, आरोग्य सहाय्यिका, श्रीम. मुणगेकर, आरोग्य सेविका, श्रीम. धुरी, आरोग्य सेविका, श्रीम केळुसकर,श्रीम. वालावलकर, श्रीम. म्हसकर, श्रीम.श्वेता ठाकूर, श्रीम. वरक श्रीम.महानंदा गोसावी, श्रीम.धर्णे, श्रीम साळगावकर,श्रीम श्रृती कुंभार गटप्रवर्तक,श्रीम.रागीणी कुंभार गटप्रवर्तक,श्रीम.अनिता खुपसे परिचर, श्रीम. प्रिती कुंभार एन. सी. डी स्टाप, श्री.मदन मसके, श्री.प्रदिप दांडगे,श्री.धामणकर,श्री.शेटये श्री.तवटे,श्री.विलास गोसावी,श्री.विलास ठाकूर आरोग्य सहाय्यक,श्री.दत्तगुरु म्हसगे, श्री.पोळ श्री. रोशन चव्हाण, श्री. दत्ताराम गोसावी, श्री. बावलेकर, डॉ.ठोंबरे,इत्यादी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.