23 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

नुक्कड़वाला सईद….! ( सिनेपट )

- Advertisement -
- Advertisement -

सिनेपट | विशेष : एकोणीसशे ऐंशीच्या दशकातील पहिली पाच वर्षे ही सिनेमा क्षेत्रातील प्रायोगीक प्रकल्प,अभिनय आणि बजेट सिनेमासाठी प्रसिद्ध आहेत.

याच दरम्यान दूरदर्शन संच हा प्रकार अगदी घरोघरी नाही तरी चाळीतील एकदोन खोल्यांमध्ये, छोट्या शहरातील सुखवस्तू घरांमध्ये, छोट्या मोठ्या उपहारगृहांमध्ये पोहोचू लागलेला होता. या दूरदर्शनवर आठवड्याला एक भाग किंवा एपिसोड अशा मालिकांची सुरवात झाली आणि मालिकेच्या निर्मात्यांनी सामाजीक वास्तवाला धरुन सादर करता येणार्या कथांवर काम करायला सुरवात केली.
तत्कालीन युवा पिढीला आपलेसे करणारी कथानकं ही त्या दूरदर्शनची ख़ासियत होती.

‘नुक्कड’ नावाची आलेली मालिका ही देखील अशाच प्रकल्पांचे एक उदाहरण. संपूर्ण अपरिचित पण आपलेसे वाटतील असे चेहरे आणि सर्वसामान्य माणसाला पटतील असे संवाद व अभिनय याची छोट्या पडद्यावरील सुरवात नुक्कड मालिकेने केली. याच मालिकेतून सिनेमासृष्टीला अनेक सहकलाकारही लाभले आणि त्यातील सर्वात मोठे व आजपर्यंत खणखणीतपणे चालणारे चलनी नांव आहे अभिनेते पवनराज ऊर्फ पवन मल्होत्रा.

जब वुई मेट मधील गीतचा म्हणजे करीना कपूरचा हळवा व तितकाच तापट काका,परदेसमधील शाहरुख़चा मित्र ह्या त्यांच्या भावनाशील भूमिका स्मरणात रहातात तशाच ब्लॅक फ्रायडे’, ‘डॉन’, ‘भाग मिल्खा भाग’ आणि ‘रुस्तम’ यासारख्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनय सादर करणारे अभिनेता पवनराज मल्होत्रा ​​चाहत्यांच्या मनात त्यांचे एक स्थान निर्माण करुन गेलेत. पवन नेहमी आपल्या सरळ-साध्या अभिनयासाठी ओळखले जातात.
‘नुक्कड’ने मिळवून दिली परंतु त्यांनी त्या यशाला समाधान न मानता तो सुरवातीच्या अभिनय प्रवासातील एक मैलाचा दगड मानला.

अभिनेता पवन मल्होत्रा ​​यांचा जन्म 2 जुलै 1958 रोजी दिल्ली येथे झाला.
पवनराज मल्होत्रा ​​यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतली. सुरुवातीपासूनच या त्यांना अभिनयात रस होता. अभ्यासाक्रम पूर्ण झाल्यानंतरच ते दिल्लीतील थिएटरमध्ये सामील झाले. थिएटर करत असताना त्यांना त्यांची पहिली मालिका मिळाली.
1986 मध्ये अभिनेत्याला दूरदर्शनवर त्यांना ‘नुक्कड’ मालिकेत सईदची भूमिका मिळाली. घरोघरी त्यांचे नाव झाले. त्यांच्या वडिलांना नेहमी वाटायचे की त्यांनी व्यवसायात करिअर करावे, परंतु त्यांनी अभिनयालाच आपले सर्वस्व मानले होते. पवन यांनी ‘नुक्कड’ व्यतिरिक्त त्याने ‘मनोरंजन’, ‘ये जो है जिंदगी’, ‘मलबार हिल्स’, ‘इंतजार’ यासारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. बदमाश कंपनी, एक थी डायन, जुड़वा 2, अंतर्नाद, शौर्य , वेलकम टू कराची, अर्थ , माय नेम इज एन्थनी, मुबारकां,सेटर्स, दे ताली , दिल्ली 6 अशा शंभरहून अधिक सिनेमांमध्ये पवन यांनी छोट्या व मोठ्या भूमिका परिणामकारकपणे करुन त्यांच्या अभिनयाची वेगळी सहकलाकाराची उंची निर्माण केलेली आहे. 1999 ते 2007 याकाळात पवन यांनी सुप्रसिद्ध सी.आय.डी.मालिकेमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावली होती.

पवन यांनी 1984 मध्ये ‘अब आयेगा मजा’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यानंतर त्यांचे चित्रपटांमध्ये काम सुरू झाले. पवन यांना 1985 मध्ये ‘खामोश’ आणि 1989 मध्ये ‘बाघ बहादूर’ अशा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांमधून विशेष ओळख मिळाली.

प्रत्येक प्रकारच्या भूमिकेत एक वेगळी छाप हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले.
पवन मल्होत्रा ​​हे एक असे कलाकार आहेत की, आपल्या चित्रपटाच्या प्रवासामध्ये त्यांनी अनेक नकारात्मक, सकारात्मक अशा सर्व प्रकारच्या भूमिका साकारत रसिकांमध्ये वाहवा मिळवली. या अभिनेत्याने बरेच पुरस्कारही जिंकले आहेत. ‘जब वी मेट’ या चित्रपटामध्ये ते करीनाच्या काकाच्या भूमिकेत दिसले होता. या छोट्या भूमिकेसाठी देखील पवन मल्होत्रांचे खूप कौतुक झाले.
पवन तसे कायमच चंदेरी दुनियेच्या झगमगाटापासून दूर रहाणे पसंत करतात.

ते नेहमीच निवडक चित्रपटांमध्ये विचारपूर्वक भूमिका निवडतात. पण ज्या मालिकेत किंवा चित्रपटात ते काम करतात, त्यात आपली एक वेगळी छाप सोडतात. पवन ‘एटनबरो की गांधी’ या चित्रपटाचे वॉर्डरोब सहाय्यक होते. पवन मल्होत्रा त्यांच्या ‘ग्रहण’ सीरीजमुळेही खूप चर्चेत होतेच . यात पवन मुख्य भूमिका साकारत होते . ही सीरीज 84च्या दंगलीवर आधारित आहे.
पवन यांनी अभिनय क्षेत्रात अनेक भूमिका साकारल्या आहेत परंतु प्रेमाने आजही त्यांना “नुक्कडवाला सईद” असेच ओळखले जाते.

अशा या विचारी तरिही निरंतर सृजनशील अभिनेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

सुयोग पंडित. ( क्लबमास्टर | सिनेपट )
( मुख्य संपादक | आपली सिंधुनगरी न्यूज )

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सिनेपट | विशेष : एकोणीसशे ऐंशीच्या दशकातील पहिली पाच वर्षे ही सिनेमा क्षेत्रातील प्रायोगीक प्रकल्प,अभिनय आणि बजेट सिनेमासाठी प्रसिद्ध आहेत.

याच दरम्यान दूरदर्शन संच हा प्रकार अगदी घरोघरी नाही तरी चाळीतील एकदोन खोल्यांमध्ये, छोट्या शहरातील सुखवस्तू घरांमध्ये, छोट्या मोठ्या उपहारगृहांमध्ये पोहोचू लागलेला होता. या दूरदर्शनवर आठवड्याला एक भाग किंवा एपिसोड अशा मालिकांची सुरवात झाली आणि मालिकेच्या निर्मात्यांनी सामाजीक वास्तवाला धरुन सादर करता येणार्या कथांवर काम करायला सुरवात केली.
तत्कालीन युवा पिढीला आपलेसे करणारी कथानकं ही त्या दूरदर्शनची ख़ासियत होती.

'नुक्कड' नावाची आलेली मालिका ही देखील अशाच प्रकल्पांचे एक उदाहरण. संपूर्ण अपरिचित पण आपलेसे वाटतील असे चेहरे आणि सर्वसामान्य माणसाला पटतील असे संवाद व अभिनय याची छोट्या पडद्यावरील सुरवात नुक्कड मालिकेने केली. याच मालिकेतून सिनेमासृष्टीला अनेक सहकलाकारही लाभले आणि त्यातील सर्वात मोठे व आजपर्यंत खणखणीतपणे चालणारे चलनी नांव आहे अभिनेते पवनराज ऊर्फ पवन मल्होत्रा.

जब वुई मेट मधील गीतचा म्हणजे करीना कपूरचा हळवा व तितकाच तापट काका,परदेसमधील शाहरुख़चा मित्र ह्या त्यांच्या भावनाशील भूमिका स्मरणात रहातात तशाच ब्लॅक फ्रायडे’, ‘डॉन’, ‘भाग मिल्खा भाग’ आणि ‘रुस्तम’ यासारख्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनय सादर करणारे अभिनेता पवनराज मल्होत्रा ​​चाहत्यांच्या मनात त्यांचे एक स्थान निर्माण करुन गेलेत. पवन नेहमी आपल्या सरळ-साध्या अभिनयासाठी ओळखले जातात.
‘नुक्कड’ने मिळवून दिली परंतु त्यांनी त्या यशाला समाधान न मानता तो सुरवातीच्या अभिनय प्रवासातील एक मैलाचा दगड मानला.

अभिनेता पवन मल्होत्रा ​​यांचा जन्म 2 जुलै 1958 रोजी दिल्ली येथे झाला.
पवनराज मल्होत्रा ​​यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतली. सुरुवातीपासूनच या त्यांना अभिनयात रस होता. अभ्यासाक्रम पूर्ण झाल्यानंतरच ते दिल्लीतील थिएटरमध्ये सामील झाले. थिएटर करत असताना त्यांना त्यांची पहिली मालिका मिळाली.
1986 मध्ये अभिनेत्याला दूरदर्शनवर त्यांना ‘नुक्कड’ मालिकेत सईदची भूमिका मिळाली. घरोघरी त्यांचे नाव झाले. त्यांच्या वडिलांना नेहमी वाटायचे की त्यांनी व्यवसायात करिअर करावे, परंतु त्यांनी अभिनयालाच आपले सर्वस्व मानले होते. पवन यांनी ‘नुक्कड’ व्यतिरिक्त त्याने ‘मनोरंजन’, ‘ये जो है जिंदगी’, ‘मलबार हिल्स’, ‘इंतजार’ यासारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. बदमाश कंपनी, एक थी डायन, जुड़वा 2, अंतर्नाद, शौर्य , वेलकम टू कराची, अर्थ , माय नेम इज एन्थनी, मुबारकां,सेटर्स, दे ताली , दिल्ली 6 अशा शंभरहून अधिक सिनेमांमध्ये पवन यांनी छोट्या व मोठ्या भूमिका परिणामकारकपणे करुन त्यांच्या अभिनयाची वेगळी सहकलाकाराची उंची निर्माण केलेली आहे. 1999 ते 2007 याकाळात पवन यांनी सुप्रसिद्ध सी.आय.डी.मालिकेमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावली होती.

पवन यांनी 1984 मध्ये ‘अब आयेगा मजा’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यानंतर त्यांचे चित्रपटांमध्ये काम सुरू झाले. पवन यांना 1985 मध्ये ‘खामोश’ आणि 1989 मध्ये ‘बाघ बहादूर’ अशा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांमधून विशेष ओळख मिळाली.

प्रत्येक प्रकारच्या भूमिकेत एक वेगळी छाप हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले.
पवन मल्होत्रा ​​हे एक असे कलाकार आहेत की, आपल्या चित्रपटाच्या प्रवासामध्ये त्यांनी अनेक नकारात्मक, सकारात्मक अशा सर्व प्रकारच्या भूमिका साकारत रसिकांमध्ये वाहवा मिळवली. या अभिनेत्याने बरेच पुरस्कारही जिंकले आहेत. ‘जब वी मेट’ या चित्रपटामध्ये ते करीनाच्या काकाच्या भूमिकेत दिसले होता. या छोट्या भूमिकेसाठी देखील पवन मल्होत्रांचे खूप कौतुक झाले.
पवन तसे कायमच चंदेरी दुनियेच्या झगमगाटापासून दूर रहाणे पसंत करतात.

ते नेहमीच निवडक चित्रपटांमध्ये विचारपूर्वक भूमिका निवडतात. पण ज्या मालिकेत किंवा चित्रपटात ते काम करतात, त्यात आपली एक वेगळी छाप सोडतात. पवन ‘एटनबरो की गांधी’ या चित्रपटाचे वॉर्डरोब सहाय्यक होते. पवन मल्होत्रा त्यांच्या ‘ग्रहण’ सीरीजमुळेही खूप चर्चेत होतेच . यात पवन मुख्य भूमिका साकारत होते . ही सीरीज 84च्या दंगलीवर आधारित आहे.
पवन यांनी अभिनय क्षेत्रात अनेक भूमिका साकारल्या आहेत परंतु प्रेमाने आजही त्यांना "नुक्कडवाला सईद" असेच ओळखले जाते.

अशा या विचारी तरिही निरंतर सृजनशील अभिनेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

सुयोग पंडित. ( क्लबमास्टर | सिनेपट )
( मुख्य संपादक | आपली सिंधुनगरी न्यूज )

error: Content is protected !!