पिकांचे आधुनिक तंत्रज्ञान व विविध योजनांबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन…!
वैभववाडी | नवलराज काळे : खरीप हंगाम २०२२ यशस्वी करण्यासाठी व शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवण्यासाठी
कृषी विभागाने व कृषी महाविद्यालय, सांगूळवाडी च्या सहाय्याने कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी नाधवडे गावातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी कृषी विभागाचे जिल्हा कृषी अधिकारी दिवेकर साहेब , तालुका कृषी अधिकारी श्री कांबळे साहेब यांनी पिकांचे आधुनिक तंत्रज्ञान व विविध योजनांबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले आणि श्री फुटनकर सर यांनी विविध खरीप पिकांवरती मार्गदर्शन केले . यावेळी मंडळ कृषी अधिकारी श्री मडव साहेब , कृषी सहाय्यक पावडे मॅडम , उपसरपंच श्री.सूर्यकांत कांबळे साहेब , ग्रामपंचायत सदस्य तसेच इतर कृषि कर्मचारी, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी व्हीएसटी कंपनीकडून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन केले.
या वेळी कृषी महाविद्यालय, सांगूळवाडी चे कृषिदुत ओंकार निकम,सुहास पवार, शुभम काळोखे,शुभम गायकवाड, अक्षय डुकरे, मयुरेश सानप,अक्षय थोरात, तेजस जाधव, रोहित पैलवान व युवाकांत चकली उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी त्यांना कृषी महाविद्यालय, सांगूळवाडी चे प्राचार्य डॉ.डी बी पाटील सर, उपप्राचार्य श्री टी.बी. गायकवाड सर, व्ही.डी कदम सर आणि मेस्त्री मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.