विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
रामेश्वर सार्वजनिक वाचनमंदिर आचरा तर्फे सोमवार ४जुलैला सकाळी १०.३०वाजता वनमहोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त वाचनालयात कृषीविषयक पुस्तकांचे ग्रंथ प्रदर्शन आणि संस्थेच्या सहकार्यवाह उर्मिला सांबारी यांच्या परसबागेत वृक्षारोपण करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.तरी कृषी प्रेमीनी कृषीविषयक ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत सांबारी कार्यवाह अर्जुन बापर्डेकर यांनी केले आहे.