जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांनी निवड केली जाहीर..!
चिंदर/विवेक परब :
सिंधुदुर्ग जिल्हा भाजप भटके-विमुक्त जिल्हा संघटन मंत्री म्हणून आचरा येथील सुनिल खरात यांची नियुक्ती करण्यात आली.
कुडाळ येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे श्री. सुनिल खरात यांना जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले व सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजप कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे, निलम पांजरी मालवण शक्तीकेंद्र प्रमुख, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश झोरे, शशिकांत इंगळे-भटके विमुक्त हक्क परिषद ” जिल्हाध्यक्ष, राजु इंगळे समाजसेवक, सुरेश झोरे, दिपक खरात, विनोद मुणगेकर, राजाराम पाटील, हर्ष गावकर, रामचंद्र मसुरकर,शैलेश मयेकर इ. उपस्थित होते.