मालवण | सुयोग पंडित ( संपादकीय विशेष ) : आज दुपारी आमदार वैभव नाईक यांचे मालवण भरड येथे जंगी स्वागत करण्यात आले. यामध्ये मालवणातील शिवसैनिक व पदाधिकारी ,युवासैनिक व पदाधिकारी यांचा समावेश होताच परंतु त्यात ‘स्वराज्य महिला ढोल पथकाने’ दिलेली सलामीसुद्धा लक्षणीय होती.
गेले काही दिवस अस्पष्ट व धाकधुकीच्या वातावरणात गेलेल्या शिवसेना पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते तथा महिला कार्यकर्त्या यांनी स्वराज्य महिला ढोलपथकाद्वारा शिव आनंदाने दिलेली सलामी ही एरवीच्या ढोल वादन सादरीकरणापेक्षा जास्त प्रभावी जाणवली.
या महिला ढोल पथकाच्या संस्थापक व शिवप्रेमी समाजसेविका सौ.शिल्पा यतीन खोत यांनी आमदार वैभव नाईक यांना आम्रमाला म्हणजेच आंब्याचा हार घालून केलेले त्यांचे स्वागत शिवसेना प्रेमींच्या मनातील खूप काही सांगून जाणारे ठरले.
सौ.शिल्पा यतीन खोत यांनी स्वराज्य महिला ढोल पथकाद्वारा दिलेली सलामी आणि एकंदरच तावून सुलाखून चैतन्यमय झालेले मालवण शिवसेनाप्रेमी जणू आम्रमालेच्या रंगांत रंगून म्हणत होती ,” ढोल बजने लगा…गांव सजने लगा..कोई लौटके आया है…संग अपने वो रंग कितने लाया है….!”
आमदार वैभव नाईक यांचे हे स्वागत स्वतः आमदारांनी अतिशय नम्रपणे स्विकारत सर्वांना आपल्यावरील जबाबदार्यांची जाणीवही करुन देऊन त्यांनी त्यांच्यातील जबाबदार आमदार रंगाचीही ओघवत्या शैलीत उधळण केली.
रात्रभर पावसाची संततधार…सकाळीही पाऊस जोरदार…तरिही आमदारांच्या आगमन काळात पावसाने घेतलेली काहीकाळाची उसंत ही मालवण शिवसेनाप्रेमींसाठी शिवानंद देऊन गेली.