आंदोलनात पर्यावरण प्रेमी,जनतेने सहभागी व्हावे :मालवण तालुका अध्यक्ष विनोद सांडव
चौके | प्रतिनिधी : पेट्रोल डिझेल व घरगुती गॅस सिलेंडर यांची झालेली भरमसाठ दरवाढ यामुळे जनता त्रस्त झालेली आहे.तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यावरणाला मारक ठरणारे जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी मनसेतर्फे पर्यावरण दिनी करण्यात आली होती.
अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना हटवण्यात आले नाही, तर मनसे ‘अप्पर जिल्हाधिकारी हटाव आणि पर्यावरण बचाव’ अशाप्रकारचे आंदोलन करेल, असा इशाराही मनसेतर्फे देण्यात आला होता. पेट्रोल डिझेल व घरगुती गॅस सिलेंडर यांची भरमसाठ दरवाढ यामुळे जनता महागाईने होरफळली आहे सत्ताधारी व विरोधी पक्ष भाजप या इंधन दरवाढीला जबाबदार आहे. या दरवाढीविरोधात कोणताही राजकीय पक्ष रस्त्यावर येताना दिसत नाही जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित इंधन दरवाढीवर प्रश्न उपस्थित न करता फक्त एकमेकांवर आरोप करत आहेत. म्हणूनच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उद्या मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली इंधनाच्या दरवाढीविरोधात तसेच जिल्ह्याचे पर्यावरण वाचवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनात पर्यावरण प्रेमींनी व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी केले आहे.