ग्रामविकास मंडळाचा स्तुत्य उपक्रम..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
ग्रामविकास मंडळ, नाटळ आणि राजवाडी उत्कर्ष मंडळाच्या माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षारोपणचा कार्यक्रम नाटळच्या जंगल भागात आयोजित केला होता. उपाध्यक्ष भालचंद्र सावंत, यांच्या हस्ते वृक्ष रोप लावून शुभारंभ झाला. वड, पिंपळ, आंबा, कोकम, फणस बिया, करवंदे कलम, पेरू, उंबर, सुरंगी, काजरा, अर्जुन, तिरफळ, रक्तरोहिडा ही बहुपयोगी झाडे लावली.
यावेळी मुलांसोबत वनविभागाचे वनरक्षक तसेच प्रकाश राणे, रावजी गावकर, मिलिंद सावंत, अजय सावंत, सौ. आणि श्री. ओंकार सावंत भालचंद्र सावंत, तुषार सावंत, जयवंत सावंत, आदित्य-अदवैत-सिद्धांत आणि ग्रामविकास मंडळ, नाटळचे अध्यक्ष विश्वनाथ सावंत तसेच आनंद तांबे व सुनील मेस्त्री हे शिक्षक सहभागी झाले होते.मुलांना पर्यावरण विषयक माहिती शिक्षक सुनील मेस्त्री यांनी दिली.
जयवंत सावंत यांनी ग्लोबल वॉर्मिंगचे मानवी जीवनावर होणारे परिणाम सांगितले.
वनविभागाचे चव्हाण मॅडम, श्री गुडेकर आणि श्री राठोड यांनी कोकण आणि मराठवाडामधील पर्यावरण यातील फरक सांगितला. वृक्षारोपण कार्यक्रमाने पुस्तकाबाहेरील धडा आज मुले हसतखेळत शिकली असे ग्रामविकास मंडळ अध्यक्ष विश्वनाथ सावंत म्हणाले.