बंड्या खोत मित्रमंडळाची स्त्रियांची नारळ लढविणे स्पर्धा ठरली आकर्षण.
तोंडवळीच्या सौ.आरोही गोलतकर ठरल्या पैठणीच्या मानकरी
मालवण | मिलिंद माणगांवकर : तालुक्यातील कालावल तरीच्या जेटीवर नारळी पोर्णिमा नियंत्रीत उत्साहात साजरी केली गेली.या नारळी पौर्णिमा उत्सवासाठी बंड्या खोत मित्रमंडळामार्फत महिलांसाठी नारळ लढविण्याची स्पर्धा घेण्यात आली.
सांस्कृतिक व सामाजिक वारसा व परंपरा जपताना स्त्रियांची सक्षमता हेच समाजाचे चैतन्य असल्यामुळे ह्या स्पर्धेचे आयोजन केले गेल्याचे बंड्याखोत मित्रमंडळाकडून सांगण्यात आले.
स्पर्धेतील प्रथम पारितोषिक सौ.आरोही गोलतकर,तोंडवळी यांनी पटकावून पैठणी साडीचे बक्षिस जिंकले.
द्वितीय पारितोषिक म्हणून असलेली सोन्याची नथ तन्वी सावंत,वायंगणी ह्यांनी पटकावले तर तृतीय पारितोषिक म्हणून सेमी पैठणी मानसी गोलतकर,तोंडवळी यांनी मिळवली.
उत्तेजनार्थ म्हणून समिक्षा सावंत यांना गौरविण्यात आले.
सदर छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून वायंगणी सरपंच सौ.संजना रेडकर उपस्थित होत्या. शिवसेनेचे किसन मांजरेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
बंड्याखोत मित्रमंडळातील अनेक सदस्य ,श्री साळकर, मंदार सरजोशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम शांततापूर्णपणे पार पडला. सामाजिक कार्यकर्ते बंड्या खोत यांच्या या कोकणच्या सांस्कृतिक उपक्रमाचे महिला वर्गातून आणि कालावल,वायंगणी,मसुरे कावा, हडी,तोंडवळी व तालुक्यातील इतर परिसरातूनही कौतुक होत आहे.