28 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांत फलक लावून वृक्षारोपण करणार असल्याचा इशारा ; पाडलोस ग्रा.पं.सदस्य लिना माधव..

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब :
पाडलोस मधील कालव्याच्या पुलावरील रस्त्याचे काम करून पंधरा दिवसांचा कालावधी उलटला नसतानाही रस्ता उखडला. त्यानंतर प्रशासनाकडे खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष होत आहे. अशा धोकादायक कामाकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच अधिकाऱ्यांना जाग येण्यासाठी कोणतेही निवेदन न देता पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांत फलक लावून वृक्षारोपण करणार असल्याचा इशारा, पाडलोस ग्रा.पं.सदस्य लिना माधव यांनी प्रशासनास दिला आहे.
खडीकरण व डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर पंधरा दिवसांत खड्डे पडल्याने अशा बेजबाबदार कामाची चौकशी करण्याची तसदीही अधिकारी घेत नाहीत. दुसरीकडे बांदा-शिरोडा मार्गावर पाडलोसमध्ये सर्वत्रच खड्डे पडले आहेत. परंतु लोकप्रतिनिधींनाच खड्डे दिसत नसल्याने अधिकाऱ्यांनीही डोळ्यावर पट्टी बांधली की काय असा सवाल वाहनचालक व प्रवाशांमधून होत आहे.

पाडलोस-मडुरा भागातील सीमाभागात तसेच केणीवाडा येथे रस्त्यावर मोठ्याप्रमाणात खड्डे पडले असून येत्या दहा दिवसांत तात्पुरत्या स्वरुपात तरी डागडुजी न केल्यास आम्ही ग्रामस्थांसहीत पदाधिकारी खड्ड्यात वृक्षारोपण करून त्यावर फलक लावणार असल्याचा इशारा सौ.माधव यांनी दिला.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | राकेश परब :
पाडलोस मधील कालव्याच्या पुलावरील रस्त्याचे काम करून पंधरा दिवसांचा कालावधी उलटला नसतानाही रस्ता उखडला. त्यानंतर प्रशासनाकडे खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष होत आहे. अशा धोकादायक कामाकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच अधिकाऱ्यांना जाग येण्यासाठी कोणतेही निवेदन न देता पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांत फलक लावून वृक्षारोपण करणार असल्याचा इशारा, पाडलोस ग्रा.पं.सदस्य लिना माधव यांनी प्रशासनास दिला आहे.
खडीकरण व डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर पंधरा दिवसांत खड्डे पडल्याने अशा बेजबाबदार कामाची चौकशी करण्याची तसदीही अधिकारी घेत नाहीत. दुसरीकडे बांदा-शिरोडा मार्गावर पाडलोसमध्ये सर्वत्रच खड्डे पडले आहेत. परंतु लोकप्रतिनिधींनाच खड्डे दिसत नसल्याने अधिकाऱ्यांनीही डोळ्यावर पट्टी बांधली की काय असा सवाल वाहनचालक व प्रवाशांमधून होत आहे.

पाडलोस-मडुरा भागातील सीमाभागात तसेच केणीवाडा येथे रस्त्यावर मोठ्याप्रमाणात खड्डे पडले असून येत्या दहा दिवसांत तात्पुरत्या स्वरुपात तरी डागडुजी न केल्यास आम्ही ग्रामस्थांसहीत पदाधिकारी खड्ड्यात वृक्षारोपण करून त्यावर फलक लावणार असल्याचा इशारा सौ.माधव यांनी दिला.

error: Content is protected !!